Mumbai Mono Rail: पावसाळ्यापासून बंद असलेली मोनोरेल केव्हापासून सुरू होणार? MMRDA ने दिली महत्त्वाची अपडेट
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पावसाळ्यामध्ये सलग दोनदा झालेल्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएकडून अनिश्चित काळासाठी मोनो रेल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता अखेर लवकरच ही मोनो रेल सेवा सुरू होणार आहे.
मुंबई: ऑगस्ट महिन्यापासून बंद असलेली चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. साडेचार महिन्यांपासून ही मोनोरेल सेवा बंद आहे. तब्बल नऊ ते दहा महिने ही मोनो रेल सेवा बंद राहिल. मे 2026 पासून ही मोनो रेल सुरू होणार आहे. पावसाळ्या आधी नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल करण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. त्या दृष्टीने एमएमआरडीएकडून काम पूर्ण केले जाणार आहे. पावसाळ्यामध्ये सलग दोनदा झालेल्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएकडून अनिश्चित काळासाठी मोनो रेल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मे महिन्यापासून मोनो रेल सेवा सुरू होणार आहे.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक नंतर अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द ही मोनोरेल सेवाही लवकरच सुरू करण्याचा विचार एमएमआरडीएचा आहे. मेट्रो प्रमाणेच मोनोरेलचेही जाळे मुंबईमध्ये निर्माण केले जाणार आहे. मोनो रेलच्या संख्या, त्यांची दुरावस्था आणि वारंवार होणारे अपघात- दुर्घटना यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. पावसाळ्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएकडून नवीन यंत्रणा बसवण्यात आली होती. मोनो रेलच्या ताफ्यात नवीन दहा मोनो रेल दाखल करण्यात आल्या आहेत. नवीन यंत्रणेची ट्रायल रनही जवळपास पूर्ण झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये एमएमआरडीएने मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी आयएसए सुरक्षा तपासणी सुरू केली आहे.
advertisement
आयएसए सुरक्षा तपासणी आणखी पुढचे काही दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच मोनोरेल्वेला सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएकडून ज्या नवीन मेट्रो सुरू होणार आहेत, त्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपयुक्त अशी संपूर्ण मोनोरेल असणार आहे. मोनोरेल सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यासाठी निवृत्त मेट्रो आयुक्त आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांची स्वतंत्र अभियंता म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलचा निर्णय मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. हा निर्णय मंजुर होण्यासाठी एमएमआरडीएकडून पाठपुरावा सुरू झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 8:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Mono Rail: पावसाळ्यापासून बंद असलेली मोनोरेल केव्हापासून सुरू होणार? MMRDA ने दिली महत्त्वाची अपडेट








