Ambadichya Fulachi Chatni : शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी, Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अंबाडीची हिरवीगार भाजी ही पावसाळ्यात आहारात घेतली जाते. त्यानंतर हिवाळ्यात या भाजीला फुल येतात. त्याला बोंड देखील म्हटल्या जाते. त्याच अंबाडीच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
अमरावती : अंबाडीची हिरवीगार भाजी ही पावसाळ्यात आहारात घेतली जाते. त्यानंतर हिवाळ्यात या भाजीला फुले येतात. त्याला बोंड देखील म्हटले जाते. त्याच अंबाडीच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ही फुले आहारात घेण्यासाठी तुम्ही चहा, काढा, जॅम, ज्यूस आणि चटणी बनवू शकता. या फुलांची चटणी अतिशय टेस्टी लागते. तसेच बनवायला देखील सोपी आहे. जाणून घेऊ रेसिपी.
अंबाडीच्या फुलांची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अंबाडीची ताजी फुले, हिरवी मिरची, लसूण, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, साखर आणि तेल हे साहित्य लागेल.
अंबाडीच्या फुलांची चटणी बनवण्याची कृती
सर्वात आधी फुले स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या. पाकळ्या काढून झाल्या की, सर्व साहित्य मिक्सरमधून किंवा पाट्यावर बारीक करून घ्यायचे आहे. त्यासाठी पाकळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि साखर हे सर्व एकत्र करायचे आहे. नंतर बारीक करायचे आहे.
advertisement
बारीक करून घेतल्यानंतर जिरे आणि तेलाचा तडका द्यायचा आहे. त्यासाठी तेल थोडे गरम करून त्यात जिरे टाकायचे आहे. लगेच त्यात वरील केलेले सारण टाकून ते मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यात मीठ टाकायचे आहे. चटणी 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता. आंबट गोड अशी ही चटणी अतिशय टेस्टी लागते. तुम्ही नक्की बनवून बघा.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Nov 24, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Ambadichya Fulachi Chatni : शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी, Video









