मुंबईत हक्काचे दुकान मिळवण्याची संधी कायम! म्हाडा गाळ्यांच्या लिलावास मुदतवाढ; आता 'या' दिवसापर्यंत करा अर्ज
Last Updated:
MHADA Online Auction : मुंबईतील 84 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावासाठी म्हाडाने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. पात्र अर्जदारांसाठी 4 फेब्रुवारी 2026 रोजी ऑनलाइन लिलाव होणार आहे.
मुंबई : मुंबई म्हाडा अंतर्गत येणाऱ्या मुंबई मंडळामार्फत मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरात असलेल्या 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत
या ई-लिलावासाठी इच्छुक अर्जदारांना ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी आता दि 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत संपणार होती मात्र नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि अर्जदारांची मागणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाइन ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. हा लिलाव पूर्णपणे ऑनलाईन पार पडणार असून इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहभाग नोंदवायचा आहे.
advertisement
ऑनलाइन लिलावासाठी अधिकृत वेबसाईट जाहीर
हा ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या या गाळ्यांमध्ये दुकाने, कार्यालये तसेच इतर व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त जागांचा समावेश आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून या ई-लिलावाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत हक्काचे दुकान मिळवण्याची संधी कायम! म्हाडा गाळ्यांच्या लिलावास मुदतवाढ; आता 'या' दिवसापर्यंत करा अर्ज










