हिवाळ्यात आरोग्यासाठी बेस्ट डिश, 10 मिनिटांत बनवा तिळाची पोळी, संपूर्ण रेसिपी VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
हिवाळ्याच्या दिवसात हमखास तिळाची पोळी बनवली जाते. ही चविष्ट तर लागते परंतु शरीरासाठी ती चांगली सुद्धा असते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबवली : हिवाळ्या शरीरासाठी सगळ्यात चांगला असणारा पदार्थ म्हणजे तीळ. तिळाचे अनेक पदार्थ बनवले जातात त्यापैकी तिळगुळ आणि चिक्की तर आपल्याला माहीतच आहे परंतु तिळाची पोळी सुद्धा कोकणात खूप प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या दिवसात हमखास तिळाची पोळी बनवली जाते. ही चविष्ट तर लागते परंतु शरीरासाठी ती चांगली सुद्धा असते. ही तिळाची पोळी पटकन 10 मिनिटांत कशी बनवायची याचीच रेसिपी आपल्याला डोंबवलीमधील गृहिणी योगिता परब यांनी सांगितली आहे.
advertisement
तिळाची पोळी बनवण्यासाठी साहित्य
अर्धा वाटी तिळ, एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक वाटी गुळ, एक वाटी मैदा, एक वाटी सुक किसलेलं खोबरं, जायफळ आणि वेलची पावडर हे साहित्य लागेल.
तिळाची पोळी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम तीळ, शेंगदाणे, गुळ, किसलेलं खोबरं, जायफळ आणि वेलची पावडर मी सगळे जिन्नस एकत्र करून घ्या. एकत्र करून हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याचे पीठ मळून घेऊन मऊ लुसलुशीत करा. मैद्याचे पीठ अर्धा तास झाकून पोळी लाटायला घेऊ शकता.
advertisement
सर्वप्रथम मैद्याचा गोळा घेऊन थोडी लाटून घ्या त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून काढलेले जिन्नस दोन चमचे घाला आणि पुन्हा गोळा बनवून पोळी लाटा. जितकी मोठी पोळी लाटता येईल तितकी मोठी पोळी लाटण्याचा प्रयत्न करा. पोळी व्यवस्थित गोल लाटल्यानंतर एका तव्यामध्ये खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्या. तुम्हाला हव असेल तर पोळीला तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता. अशा पद्धतीने आपली तिळाची पोळी तयार आहे. मी तिळाची पोळी तुम्ही चहा सोबत किंवा असंच सुद्धा खाऊ शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 25, 2024 1:26 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
हिवाळ्यात आरोग्यासाठी बेस्ट डिश, 10 मिनिटांत बनवा तिळाची पोळी, संपूर्ण रेसिपी VIDEO