अस्सल विदर्भ स्टाईल! हिवाळ्यात बनवा तुरीच्या दाण्यांपासून सोले भात, रेसिपीचा संपूर्ण रेसिपी VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
विदर्भातील सर्वात स्पेशल पदार्थ म्हणजे सोले भात. अगदी विक्रीत महागडा पुलाव सुद्धा मागे टाकेल असा चविष्ट आणि दाणेदार सोले भात विदर्भात बनवला जातो.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळा स्पेशल तुरीच्या दाण्यांपासून बनवलेल्या अनेक रेसिपी आपण बघितल्या असतील. त्यातीलच आणखी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत. ती म्हणजे सोले भात आणि कढी. विदर्भातील सर्वात स्पेशल पदार्थ म्हणजे सोले भात. अगदी विक्रीत महागडा पुलाव सुद्धा मागे टाकेल असा चविष्ट आणि दाणेदार सोले भात विदर्भात बनवला जातो. ज्याची रेसिपी अगदी सोपी आहे. हिवाळा स्पेशल सोले भात कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील दुर्गा देशपांडे यांनी सांगितली आहे.
advertisement
सोले भात बनवण्यासाठी साहित्य
तांदूळ, तुरीचे ताजे दाणे, फुल कोबी, बटाटा, टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणे, हिरवी मिरची, तेल, जिरे, मोहरी, लाल तिखट, मीठ, धनिया पावडर, हळद, मसाला, लसूण पेस्ट हे साहित्य लागेल.
सोले भात बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून पूर्ण मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी तेल गरम झाल्यावर मोहरी आणि जिरे टाकायचे. त्यानंतर कांदा आणि मिरची टाकून घ्यायचे. ते थोडे लालसर होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर लाल तिखट आणि इतर मसाले टाकून घ्यायचे. ते थोडा वेळ शिजवून घ्यायचे. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून ते परतवून घ्यायचे. टोमॅटो थोडे नरम झाल्यानंतर त्यात बटाटा, फुल कोबी आणि तुरीचे दाणे टाकायचे आणि ते परतवून घ्यायचं.
advertisement
त्यानंतर त्यात शेंगदाणे टाकून ते थोडा वेळ शिजवून घ्यायचं. तो पर्यंत भात बसवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचे.
त्यानंतर तांदूळ धुवून घ्यायचे आणि तयार झालेल्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे. 5 ते 10 मिनिट तांदूळ त्यात परतवून घ्यायचे आहेत. त्यामुळे भात दाणेदार होण्यास मदत होते. 10 मिनिटनंतर गरम पाणी घालून भात परतवून घ्यायचा आहे. लागते तेवढं पाणी घालून घालायचं आहे. त्यानंतर त्यात कोथिंबीर घालून भात 20 मिनिट शिजवून घ्यायचा आहे.
advertisement
20 मिनिटानंतर सोले भात तयार झालेला असेल. हा भात तुम्ही कढी सोबत खाऊ शकता. त्याचबरोबर गोड दही सुद्धा घेऊ शकता. हा भात बनवण्यासाठी तुम्ही कुकर सुद्धा वापरू शकता. त्यासाठी भात बनवण्याची वेगळी पद्धत वापरावी लागेल. त्याशिवाय कुकरमध्ये भात एकजीव होत नाही. कमीत कमी वेळात दाणेदार आणि टेस्टी असा सोले भात तयार होतो.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
December 27, 2024 3:47 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
अस्सल विदर्भ स्टाईल! हिवाळ्यात बनवा तुरीच्या दाण्यांपासून सोले भात, रेसिपीचा संपूर्ण रेसिपी VIDEO

