संक्रांतीच्या वाणासाठी घरीच बनवा घेवर, पाहा सोपी रेसिपी, Video

Last Updated:

मकर संक्रांतीला घेवर आणि फेणी या दोन खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते.

+
संक्रांतीच्या

संक्रांतीच्या वाणात घेवर आणि फेणीला महत्त्व, पाहा सोपी रेसिपी, Video

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: आपल्याकडे वेगवेगळ्या सणावारांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे विशेष महत्त्व असतं. मकर संक्रांत सण जवळ येत आहे. मकर संक्रांतीला देखील खाद्यपदार्थ तसेच पेहरावाबाबत काही नियम आहेत. आपल्याकडे दिवाळीला ज्याप्रमाणे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा फराळ केला जातो. त्याचप्रकारे मकर संक्रांतीला जालना शहरामध्ये घेवर आणि फेणी या दोन खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. विशेष म्हणजे दोन्ही खाद्यपदार्थ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
advertisement
घेवरला मोठी मागणी
मकर संक्रांत जवळ येताच जालना शहरातील बडी सडक घेवर आणि फेणींच्या दुकानाने गजबजू लागते. मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फेनी दोन्ही खाद्यपदार्थ वाणासाठी दिले जातात. जालना शहरातील मारवाडी समाजामध्ये हे पदार्थ जास्त प्रचलित आहे. फेणी हा पदार्थ हैदराबाद वरून मागवला जातो. तर घेवर हे जालन्यातच मैद्यापासून तयार केले जातात.
advertisement
काय आहे महत्व?
घेवर आणि फेणी विक्रीचा आमचा संक्रांतीच्या आधी पंधरा दिवसांचा सीजन असतो. मकर संक्रांतीसाठी वाणाला या दोन पदार्थांचा मान असतो. घेवर हे मैदा, दूध, साखर आणि पाणी यापासून बनवलं जातं. तर फेणी देखील मैद्यापासूनच बनवली जाते. मात्र ती हैदराबाद वरून मागवली जाते. दिवाळीला ज्याप्रमाणे झाडू आणि इतर साहित्याचा मान असतो तसंच संक्रांतीला घेवर फेणीचा मान असल्याचे विक्रेते तिवारी यांनी सांगितलं
advertisement
कसं तयार करतात घेवर?
घेवर तयार करण्यासाठी सगळ्यात आधी वनस्पती तूप गरम केलं जातं. त्यामध्ये गरम पाणी घालून त्याला एकजीव करण्यात येतं. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये हळूहळू मैदा सोडण्यात येतो. परत हे मिश्रण एकजीव करून घेतलं जातं. या मिश्रणामध्ये यानंतर कलर सोडला जातो. कलरला देखील अतिशय व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर साच्याला गॅसवर ठेवला जातो. त्यामध्ये तेल ओतून हळूहळू एकजीव केलेल मिश्रण साच्यामध्ये सोडलं जातं. दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चार साच्यांमध्ये चार घेवर तयार होतात. तयार झालेले घेवर एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी साखरेच्या पाकामध्ये सोडले जातात, असं घेवर तयार करणाऱ्या पंचशीला तिवारी यांनी सांगितलं.
advertisement
घेवर आणि फेणी हे दोन्ही पदार्थ मैदा आणि साखर यापासून बनवलेले अतिशय रुचकर असे पदार्थ आहेत. संक्रांतीसाठी या दोन्ही पदार्थांचे अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीच्या पंधरा दिवस आधी शहरातील बडी सडक या दोन पदार्थांच्या दुकानांनी गजबजून जाते. जालना शहरातील नागरिकांची मागणी देखील या दोन पदार्थांना या काळात मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते.
मराठी बातम्या/रेसिपी/
संक्रांतीच्या वाणासाठी घरीच बनवा घेवर, पाहा सोपी रेसिपी, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement