Monsoon Recipe: पावसाळ्यात गरमागरम खायला हवंच, बनवा कुरकुरीत अशी बांगडी भजी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रिमझिम बरसणारा पाऊस गरमागरम चहा आणि सोबतीला कुरकुरीत भजी, पावसाळा म्हटलं की, हा बेत तर ठरलेलाच असतो. कांदा भजी, बटाटा भजी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण बनवतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बांगडी भजी. गोल बांगडीच्या आकाराचा कांदा कापून ही भजी बनवली जातात.
अमरावती : रिमझिम बरसणारा पाऊस, गरमागरम चहा आणि सोबतीला कुरकुरीत भजी. पावसाळा म्हटलं की, हा बेत तर ठरलेलाच असतो. कांदा भजी, बटाटा भजी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण बनवतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बांगडी भजी. गोल बांगडीच्या आकाराचा कांदा कापून ही भजी बनवली जातात. त्यामुळे याला बांगडी भजी असे म्हणतात. कुरकुरीत अशी बांगडी भजी कशी बनवायची? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी दिली आहे.
बांगडी भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे
गोल काप करून घेतलेले कांदे, बेसन पीठ, मक्याचे पोहे बारीक करून घेतलेले, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, ओवा, तेल, लागत असल्यास तुम्ही लसूण पेस्ट सुद्धा घेऊ शकता.
advertisement
बांगडी भजी बनवण्याची कृती
सर्वात आधी आपल्याला बेसन पीठ भिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यात लाल तिखट, मीठ, हळद, जिरे आणि ओवा थोडा हातावर बारीक करून टाकून द्यायचा आहे. त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून बेसन पीठ भिजवून घ्यायचे आहे. बेसन पीठ हे जास्त पातळ भिजवायचे नाही. कांद्याला बेसनाचे कोटिंग लागेल अशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे.
advertisement
त्यानंतर भजी तळून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचे आहे. मध्यम आचेवर तेल गरम होतपर्यंत भजी तुम्ही तयार करून घेऊ शकता. भजी तयार करण्यासाठी कांद्याचा गोल काप हा भिजवलेल्या बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात तो व्यवस्थित भिजवून त्याला मक्याच्या पोह्यात सुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर गरम झालेल्या तेलात टाकून द्यायचे आहे. भजी तळताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे.
advertisement
सर्व भजी मंद आचेवर तळून घ्यायची आहेत. त्यानंतर ही भजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. अशी कमीत कमी वेळात कुरकुरीत भजी तयार होतात. मक्याचे पीठ वापरल्यास भजी कुरकुरीत होण्यास मदत होते. एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांदा हा कापताना आडवा कापायचा आहे. त्यानंतर त्याचे गोल काप होतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jun 03, 2025 6:37 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Monsoon Recipe: पावसाळ्यात गरमागरम खायला हवंच, बनवा कुरकुरीत अशी बांगडी भजी, रेसिपीचा संपूर्ण Video







