Khichdi Vade Recipe: पावसाळ्यात नाश्त्यासाठी करा खिचडी वड्याचा बेत, चटपटीत रेसिपीने मन होईल तृप्त, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Khichdi Vade Recipe: पावसाळ्यात सायंकाळच्या वेळी नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत पाहिजे असते. तांदूळ आणि डाळीच्या साध्या खिचडीपासून तयार होणारे वडे तुम्ही बनवू शकता.
अमरावती: पावसाळ्यात सायंकाळच्या वेळी नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत पाहिजे असते. अशावेळी जास्तीत जास्त भजी आणि इतर काही पदार्थ बनवले जातात. मूग आणि बरबटीची डाळ वापरून वडेसुद्धा बनवले जातात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे तांदूळ आणि डाळीच्या साध्या खिचडीपासून तयार होणारे वडे. हे वडे खाण्यासाठी टेस्टी लागतात. कढी आणि खिचडीचे वडे हा बेत असल्यास नाश्त्याला कोणीच नाही म्हणणार नाही. खिचडीचे वडे कसे बनवायचे? याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी दिली आहे.
खिचडीचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
डाळ आणि तांदूळ वापरून बनवलेली साधी खिचडी, जिरे, मोहरी, कडीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर, कोथिंबीर, बेसन पीठ/गव्हाचे पीठ, तळण्यासाठी तेल हे साहित्य लागेल.
advertisement
खिचडीचे वडे बनवण्याची कृती
सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ वापरून साधी खिचडी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर ती थंड झाल्यानंतर त्यात जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर वडे व्यवस्थित होण्याकरिता गव्हाचे पीठ किंवा बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे.
advertisement
सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर ते मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाल्यानंतर त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी थोडे मिश्रण हातावर घेऊन ते गोल करायचे आणि त्यानंतर त्याला वड्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला लागत असल्यास सर्व वडे बनवून नंतरसुद्धा तळू शकता किंवा मग एक एक वडा बनवून तळून घेऊ शकता. अशाप्रकारे सर्व वडे लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. लाल रंगाबरोबरच खमंग असे वडे तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर वडे खाण्यासाठी तयार होईल. कढी किंवा एखाद्या चटणीसोबत हे वडे तुम्ही खाऊ शकता. खिचडीचे थालीपीठसुद्धा बनवता येतात. तेसुद्धा तुम्ही बनवून बघू शकता. काहीवेळा खिचडी थोडी जास्त होते, तेव्हा उरलेल्या खिचडीपासून तुम्ही हे पदार्थ बनवू शकता.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
June 16, 2025 3:17 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Khichdi Vade Recipe: पावसाळ्यात नाश्त्यासाठी करा खिचडी वड्याचा बेत, चटपटीत रेसिपीने मन होईल तृप्त, Video