Red Aloe Vera Benefits: कधी पाहिलीये ‘या’ रंगाची कोरफड? नियमित खाल्ल्याने होतील दुप्पट फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health benefits of Red Aloe Vera in Marathi : लाल कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, ॲसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या घरच्या कुंडीत आढळणारी कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस अशा श्वसनाच्या आजारांवर ती उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो. याशिवाय कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, ॲसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याध अशा आजारांपासून सुटका होते. कोरफडीचे हे फायदे जरी असले तरीही तुमच्यापैकी अनेकांना लाल कोरफडीबद्दल माहितीच नसेल.
लाल कोरफड खरंच अस्तित्वात आहे का ?
अनेकांना आश्चर्यसुद्धा वाटू शकतं की लाल रंगाची कोरफड खरच अस्तित्वात आहे का ? लाल कोरफड ही एक दुर्मिळ प्रजाती आहे, ज्यामध्ये हिरव्या कोरफडीपेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. लाल कोरफड ही अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध आहे. जाणून घेऊयात लाल कोरफडीच्या फायद्यांबद्दल...

advertisement
रोगप्रतिकारक शक्ती वाढते :
लाल कोरफडीत असलेल्या अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक वाढते. याशिवाय लाल कोरफड बद्धकोष्ठता, आम्लता आणि गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. लाल कोरफड पचन सुधारून पोटाशी संबंधित समस्या कमी करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लाल कोरफडीचा रस घेतल्याने शरीर आतून स्वच्छ व्हायला मदत होते. कोरफडीच्या रसात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्यास अधिक फायदे होतात.
advertisement
त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याची लाल कोरफड:
लाल कोरफडीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचा तजेलदार ठेवून त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. कोरफडीतले घटक त्वचेला खोलवर पोषण देतात आणि नैसर्गिकरित्या ओलावा टिकवून ठेवतात. लाल कोरफडीच्या नियमित वापराने त्वचा उजळते आणि डाग दूर होतात. लाल कोरफडीच्या नियमित वापराने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
advertisement
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर :
लाल कोरफड ही केसांच्या आरोग्यासाठी देखील फायद्याची मानली जाते. यामुळे टाळूला पोषण मिळून कोंड्याची समस्या दूर होते. लाल कोरफडीमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यांना नैसर्गिक चमक येते. लाल कोरफडीचे जेल नारळाच्या तेलात मिसळून केसांच्या मुळांवर लावल्यास केस झडण्याची समस्या कमी होते.

advertisement
वजन कमी करण्यास उपयुक्त :
लाल कोरफड शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते आणि चयापचय वाढवते. कोरफडीच्या नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. लाल कोरफड कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित करतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदयरोगांचा धोका कमी होतो.लाल कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे दुखापत, चिडचिड किंवा सूज कमी करण्यास मदत करतात. ते प्रभावित भागावर लावल्याने जखम जलद बरी होण्यास मदत होते.
advertisement
डायबिटीसवर गुणकारी लाल कोरफड :
लाल कोरफडचा गर खाल्ल्याने किंवा ज्यूस प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. कोरफडीत असलेले घटक इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 24, 2025 4:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Red Aloe Vera Benefits: कधी पाहिलीये ‘या’ रंगाची कोरफड? नियमित खाल्ल्याने होतील दुप्पट फायदे