जेवणानंतर वॉकिंगला जात असाल तर 'हा' नियम अवश्य वाचा, हळू चालावं की फास्ट?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या शेजारच्या लोकांना रात्रीच्या वेळी फिरताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करतात.
मुंबई : निरोगी आरोग्यासाठी सकस आहार व व्यायाम जितका महत्त्वाचा आहे तितकंच चालणंही गरजेचं आहे. अनेकांना रोज सकाळी किंवा रात्री जेवणानंतर चालायला जायची सवय असते. डिनरनंतर जेवायला जाणं ही चांगली सवय आहे पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जेवणानंतर लगेच चालू नये, त्यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. जेवणानंतर किती वेळाने चालायला जायला हवं, वेगाने चालावं की हळू चालावं, जेवणानंतर चालण्याचे फायदे कोणते? या गोष्टी जाणून घेऊयात.
तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या शेजारच्या लोकांना रात्रीच्या वेळी फिरताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करतात. काही जण अर्धा किंवा एक तास चालतात. जेवणानंतर फिरल्याशिवाय ते झोपत नाहीत. काही लोक जेवणानंतर थेट झोपतात, पण असं करू नये. यामुळे जेवण नीट पचत नाही आणि सकाळी उठल्यावर पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही जेवल्यानंतर फिरायला जायलाच पाहिजे. रात्रीच्या वेळी चालायला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
advertisement
रात्री वेगाने चालू नका
अनेक हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, रात्रीचे जेवण संध्याकाळी सात वाजेपर्यंत करावं. रात्रीचं जेवण झाल्यावर लगेच चालायला जाऊ नका, तर जेवल्यानंतर किमान एक तासाने तरी चालायला जा. रात्री वेगाने चालणं टाळा, शक्य तितक्या हळू चाला. रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास ते एक तास नॉर्मल चाला. खूप वेगाने चालल्यास तुमच्या पोटात दुखू शकतं.
advertisement
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे
1.अन्न पचण्यास होते मदत
रात्रीच्या जेवणानंतर अर्धा तास चालल्यास तुमची पचनक्रिया सुधारते.तुम्हाला अपचन, पोटदुखी, गॅस या समस्याही होणार नाहीत.
2.मेटॅबॉलिझम करते बूस्ट
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने तुमचं मेटॅबॉलिझम चांगलं होतं आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहतं.
3.स्ट्राँग इम्युनिटी
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याच्या सवयीमुळे तुमची इम्युनिटी वाढेल आणि तुम्ही अनेक प्रकारच्या हंगामी आजारांपासूनही वाचाल. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज चालणं फायद्याचं ठरतं.
advertisement
4. शांत झोप
view commentsचालण्याने शरीरात एन्डॉर्फिन नावाचं हॉर्मोन रिलीज होतं. हे हॉर्मोन मेंदूला निरोगी ठेवतं आणि स्ट्रेस कमी करतं, ज्यामुळे तुम्हाला चांगली शांत झोप येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2024 1:26 PM IST


