advertisement

Fatty Liver : कोणतीही लक्षणं न दर्शवता होऊ शकतो फॅटी लिव्हर डिसीज, जाणून घ्या लक्षणं आणि उपचारांविषयी सविस्तर माहिती

Last Updated:

यकृत हा एक अत्यंत लवचिक अवयव आहे. सुरुवातीच्या काळात, त्याचं काम व्यवस्थित सुरु असतं. यातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात, यकृतामुळे प्रथिनं तयार होतात आणि पचनास मदत होते. थकवा किंवा पोटात थोडा जडपणा यासारख्या तक्रारींकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.

News18
News18
मुंबई : फॅटी लिव्हरसंदर्भात महत्त्वाची माहिती. अनेकदा कोणतीही लक्षणं नसताना फॅटी लिव्हरचं निदान होतं. अनेकदा कोणतीही वेदना किंवा तीव्र वेदना होत नाहीत, गंभीर लक्षणंही दिसत नाहीत. कोणतीही लक्षणं नसल्यामुळे याची सुरुवात झाल्याचंही कळत नाही. वैद्यकीय भाषेत, याला मेटाबॉलिक डिसफंक्शनशी संबंधित स्टीएटोटिक लिव्हर डिसीज म्हणतात.
फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरच्या एकूण वजनाच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त चरबी असते. ही प्रक्रिया शरीरात सौम्यपणे सुरू होते, पण नंतर ती सिरोसिसमधे बदलू शकते.
यकृत हा एक अत्यंत लवचिक अवयव आहे. सुरुवातीच्या काळात, त्याचं काम व्यवस्थित सुरु असतं. यातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात, यकृतामुळे प्रथिनं तयार होतात आणि पचनास मदत होते. थकवा किंवा पोटात थोडा जडपणा यासारख्या तक्रारींकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.
advertisement
फॅटी लिव्हर बहुतेकदा नियमित अल्ट्रासाऊंड किंवा इतर स्कॅन दरम्यान आढळून येतं. यकृताच्या कार्य चाचण्या देखील सुरुवातीच्या टप्प्यात सामान्य असू शकतात, कारण यकृतात रिजनरेशन करण्याची क्षमता जास्त असते. पटनाच्या ऑरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉ. अंजली सौरभ यांनी याविषयीची माहिती दिली.
जास्त कॅलरीज, विशेषतः रिफाइंड कार्ब्स आणि साखरयुक्त पेयं यकृतात चरबी म्हणून जमा होतात. कालांतरानं, यामुळे सूज येणं, फायब्रोसिस आणि गंभीर प्रकरणांमधे सिरोसिस होऊ शकतो. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, ही स्थिती लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल आणि मेटाबॉलिक सिंड्रोमशी संबंधित आहे. याचा अर्थ हा केवळ यकृताचा आजार नाही तर संपूर्ण चयापचय प्रक्रियेशी संबंधित लक्षण आहे.
advertisement
शहरी जीवनशैली, जास्त वेळ बसून राहणं, प्रक्रिया केलेलं म्हणजेच प्रोसेस्ड फूड, अपुरी झोप आणि ताणतणाव ही यामागची मुख्य कारणं आहेत. शहरी भारतातील अंदाजे तीन प्रौढांपैकी एकाला फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनं जीवनशैलीशी संबंधित नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या वाढत्या ओझ्याबद्दल इशारा देखील दिला आहे.
advertisement
मद्यपानामुळे हा आजार होतो असं मानलं जातं. पण बरेच रुग्ण अल्कोहोल सेवन करत नसले तरीही त्यांना त्याचा त्रास होतो. या गैरसमजामुळे वेळेवर उपाय केले जात नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यातील फॅटी लिव्हर रिव्हर्स करता येतं. पाच ते दहा टक्के वजन कमी केल्यानं यकृतावरील चरबी कमी होऊ शकते. आठवड्यातून किमान दीडशे मिनिटं व्यायाम करणं, साखर युक्त पेय न पिणं किंवा कमी करणं आणि मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणं हे सर्व परिणामकारक उपाय आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fatty Liver : कोणतीही लक्षणं न दर्शवता होऊ शकतो फॅटी लिव्हर डिसीज, जाणून घ्या लक्षणं आणि उपचारांविषयी सविस्तर माहिती
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement