Ear Care Tips : थंडीच्या काळात अशी घ्या कानाची काळजी! अन्यथा कानाचे होईल मोठे नुकसान..
- Published by:Pooja Jagtap
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. या विषयावर नाशिक येथील ई.एन.टी. तज्ञ डॉ. गौरव रॉय यांनी मार्गदर्शन केले आहे.
मुंबई : थंडीचा जोर वाढू लागला की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कानांवर देखील होतो. त्यामुळे कान दुखणे, कान खाजवणे अशा समस्या उद्भवतात. या त्रासाचे कारण केवळ सर्दी नसून, थंडीच्या काळात आपल्या काही चुकीच्या सवयींमुळेही हे होऊ शकते. या विषयावर नाशिक येथील ई.एन.टी. तज्ञ डॉ. गौरव रॉय यांनी मार्गदर्शन केले आहे.
सध्या थंडीचा पारा सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे अनेकांना कान दुखण्याचा त्रास होत आहे. त्यातच या काळात अतिप्रमाणात हेडफोन वापरल्यास ही समस्या आणखी वाढते आणि काही वेळा कर्णबधिरपण (श्रवणक्षमता कमी होणे) देखील उद्भवू शकते. त्यामुळे या काळात कानांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कानांची काळजी कशी घ्यावी?
1. अनेकजण थंडीपासून संरक्षण म्हणून कानात कापूस ठेवतात. परंतु कापूस दीर्घकाळ कानात ठेवल्यास त्रासदायक ठरू शकतो.
advertisement
2. अंघोळीनंतर कान नीट पुसणे आवश्यक आहे. कानात ओलावा राहिल्यास इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
3. कान साफ करण्यासाठी लोखंडी किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नये. यामुळे कानाच्या आतील भागाला इजा पोहोचू शकते.
4. कान साफ करताना फक्त इयरबड्सचा मर्यादित वापर करावा. कोणतीही वस्तू कानात खोलवर घालू नये.
5. काहीजण थंडीमध्ये कानात गरम तेल टाकतात. हे योग्य आहे, पण पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तेल खूप गरम नसावे, खोबऱ्याचे तेल वापरणे चांगले, आणि ते ताजे असावे.
advertisement
या सर्व गोष्टींसोबतच आजच्या युगातील सर्वसाधारण कारण म्हणजे मोबाईलचा अति वापर. मोबाईलसोबत हेडफोनचा वापर तर अपरिहार्य झाला आहे. अलीकडच्या काळात ब्लूटूथ हेडफोनचा वापर झपाट्याने वाढला असून, त्यांच्या रेडिएशनमुळे श्रवणक्षमता कमी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डॉक्टर गौरव रॉय यांचा सल्ला असा आहे की, हेडफोनचा वापर मर्यादित करावा आणि शक्यतो वायर्ड (तार असलेले) हेडफोन वापरावेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ear Care Tips : थंडीच्या काळात अशी घ्या कानाची काळजी! अन्यथा कानाचे होईल मोठे नुकसान..

