पिज्जा, बर्गर आणि चाऊमीन रोज खायची; आतड्यांमध्ये होल आणि...फास्ट फूडमुळे 16 वर्षांच्या तरुणीने गमावला जीव

Last Updated:

समोर आलेली एक बातमी प्रत्येक आई-वडिलांना आणि तरुणाईला हादरवून सोडणारी आहे. कारण या प्रकरणासमोर मोठ्या एक्सपर्ट्स डॉक्टरांनीही हार मानावी लागली.

तरुणीचा जंक फूडमुळे मृत्यू
तरुणीचा जंक फूडमुळे मृत्यू
मुंबई : संध्याकाळ झाली की गल्लीबोळातील चायनीजच्या गाड्यांवर लागणारी गर्दी, पिझ्झा-बर्गरच्या दुकानाबाहेर लागणाऱ्या रांगा आणि घराघरात दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी... हे चित्र आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण ज्या 'फास्ट फूड'ला प्राधान्य देतो, ते कधी आपल्या शरीराला आतून पोखरून काढेल, याचा अंदाजही कुणी लावला नसेल. त्यात तरुण वयात तर मुलांना बाहेरच्या गोष्टी खाण्याचं वेगळंच वेड असतं. मित्रांसोबत बाहेर जाणं, खाणं हे तर जेन्झीच्या आयुष्याचा भाग झाला आहे, त्यामुळे दररोज बाहेरचं खाणं हे आलंच.
पण उत्तर प्रदेशातील अमरोहामधून समोर आलेली एक बातमी प्रत्येक आई-वडिलांना आणि तरुणाईला हादरवून सोडणारी आहे. कारण या प्रकरणासमोर मोठ्या एक्सपर्ट्स डॉक्टरांनीही हार मानावी लागली.
एका 16 वर्षांच्या निष्पाप मुलीचा जीव फक्त जंक फूडच्या अतिसेवनामुळे गेला आहे. चाऊमीन, पिझ्झा आणि बर्गरच्या नादाने तिच्या आतड्यांची इतकी दुरवस्था झाली की, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही तिचा मृत्यू झाला.
advertisement
नेमकं काय घडलं?
अमरोहा येथील अफगानान मोहल्ल्यात राहणारी अहाना (16) ही 11 वीत शिकणारी एक हुशार मुलगी होती. अहानाला बाहेरचं खाण्याची प्रचंड आवड होती. घरच्यांनी वारंवार मनाई करूनही ती गुपचूप चाऊमीन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर खात असे. सप्टेंबर महिन्यात तिला अचानक पोटाचा त्रास सुरू झाला. 30 नोव्हेंबर रोजी त्रास असह्य झाल्याने तिला मुरादाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
तिथे तपासणी केली असता डॉक्टरही हादरले. जंक फूडच्या अतिसेवनामुळे अहानाच्या आतड्या एकमेकांना चिकटल्या होत्या आणि त्यात छिद्र पडले होते. गंभीर संसर्गामुळे तिची प्रकृती खालावली होती.
शस्त्रक्रिया झाली, पण नियतीने डाव साधला
30 नोव्हेंबर रोजी अहानाच्या आतड्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. 10 दिवसांनंतर तिला डिस्चार्जही मिळाला, पण तिचं शरीर दिवसेंदिवस कमकुवत होत गेलं. आता काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला तातडीने दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे थोडी सुधारणा जाणवत असतानाच रविवारी रात्री अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या 16 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.
advertisement
डॉक्टरांचा धोक्याचा इशारा; जंक फूड म्हणजे 'स्लो पॉयझन'?
अहानाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, मैद्यापासून बनलेले पदार्थ आणि त्यातील घातक रसायने पचायला जड असतात. सतत असे पदार्थ खाल्ल्याने आतड्यांमध्ये जळजळ निर्माण होते आणि हळूहळू आतड्यांचे कार्य बंद पडते. अहानाच्या मामांनी सांगितले की, डॉक्टरांनी तिच्या मृत्यूचे मुख्य कारण जंक फूडमुळे निकामी झालेली आतडी हेच दिले आहे.
advertisement
पालकांसाठी धोक्याची घंटा
अहानाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण या घटनेने समाजासमोर काही मोठे प्रश्न उभे केले आहेत.
मैद्याचे पदार्थ पिझ्झा, बर्गर किंवा चाऊमीनमधील मैदा आतड्यांना चिकटतो. अति तिखट आणि मसाले यामुळे आतड्यांच्या नाजूक अस्तराला इजा होऊन जखमा होतात.
त्यामुळे मुलांचे आता खाण्याचे हट्ट पुरवताना आपण त्यांना मृत्यूच्या दारात तर ढकलत नाही ना? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. अहानाची ही गोष्ट केवळ एक बातमी नाही, तर तो एक इशारा आहे. चवीच्या मागे लागून आयुष्याशी खेळू नका. आपल्या आहारात ताज्या भाज्या आणि घरच्या अन्नाचा समावेश करा, अन्यथा हा 'फास्ट फूड'चा रस्ता थेट हॉस्पिटलच्या दारापर्यंत नेतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पिज्जा, बर्गर आणि चाऊमीन रोज खायची; आतड्यांमध्ये होल आणि...फास्ट फूडमुळे 16 वर्षांच्या तरुणीने गमावला जीव
Next Article
advertisement
Navi Mumbai News:  रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं घडलं काय?
रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं
  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

  • रुग्णवाहिकेचा चालक जेवायला गेला अन् प्रवाशाने गमावले प्राण, वाशी स्थानकात नेमकं

View All
advertisement