भावा, या पनीर कचोरीचा स्वादच वेगळा! दुकान उघडताच होते मोठी गर्दी, हे आहे लोकेशन
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
येथे मिळणारी स्पेशल कचोरीची चव खूप प्रसिद्ध आहे.
सत्यम कटियार, प्रतिनिधी
फर्रुखाबाद, 22 ऑक्टोबर : भारतामध्ये प्रत्येक भागामध्ये तेथील स्थानिक खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी काही असे रेस्टॉरंट्सही आहेत, जे आपल्या चवीमुळे ग्राहकांना, खवय्यांना आकर्षित करतात. आज अशाच एका खाद्यपदार्थाच्या दुकानाबाबत जाणून घेऊयात, जे खवय्यांना आपल्याकडे प्रचंड आकर्षित करत आहे.
हे दुकान उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद येथे आहे. येथे मिळणारी स्पेशल कचोरीची चव खूप प्रसिद्ध आहे. मनोज फूड भांडार असे या दुकानाचे नाव असून ते कमालगंज पोलीस ठाण्याजवळ आहे. येथील चव अशी आहे की, जो कुणी एकदा याठिकाणी येतो, त्याला पुन्हापुन्हा याठिकाणी यावेसे वाटते.
advertisement
प्रत्येक दिवशी याठिकाणी हजारो लोक येतात आणि पनीरपासून तयार झालेल्या कचोरीचा आनंद घेतात. दुकान उघडल्यावरच याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. याबाबत दुकानदार मनोज गुप्ता हे सांगतात की, खस्ता कचोरी बनवण्यासाठी मसाला घरीच बारीक करून तयार केला जातो. त्यात मेथीचाही काही प्रमाणात वापर केला जातो. तसेच ज्या तेलापासून कचोरी बनवल्या जातात त्या तेलाच्या शुद्धतेकडेही विशेष लक्ष दिले जाते, असे ते म्हणाले.
advertisement
चार वर्षांपासून चालवत आहेत दुकान -
दुकानदार मनोज गुप्ता यांनी सांगितले की, पनीरच्या भाजीसह खस्ता कचोरी ग्राहकांना दिली जाते. याची चव खूप चांगली आहे. मागील 4 वर्षांपासून ते हे दुकान चालवत आहेत. याठिकामी 20 रुपयांमध्ये 4 कचोरी आणि पनीरची भाजी दिली जाते. यामध्ये अगदी कमी पैशात ग्राहकाचे पोट चांगलेच भरते. या माध्यमातून ते प्रत्येक दिवशी 2 हजार रुपये कमावतात. तसेच याप्रकारे महिन्याभरात त्यांची 50 हजार रुपयांची बचत होते.
advertisement
येथे खायला येणारे लोक सांगतात की, याठिकाणी नाश्त्यामध्ये मटर पनीरसोबत कचोरीची क्वालिटीकडे विशेष लक्ष दिले जाते. कचोरी जास्त महाग नाही. फक्त 20 रुपयांमध्ये एक प्लेट मिळते. या प्लेटचा आकार खूप मोठा असतो. ग्राहकांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये म्हणून घरी तयार केलेल्या मसाल्यांचा वापर केला जातो.
Location :
Uttar Pradesh
First Published :
October 22, 2023 7:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भावा, या पनीर कचोरीचा स्वादच वेगळा! दुकान उघडताच होते मोठी गर्दी, हे आहे लोकेशन