advertisement

Ganesh Chaturthi: यंदाच्या गणेशोस्तवात सात्विक जेवणाला द्या हटके ट्विस्ट, कांदा-लसूण न वापरताही वाढेल चव

Last Updated:

गणेशोस्तवात जे लोक उपवास करत नाहीत पण ज्यांना सात्विक पदार्थ खाण्याची इच्छा आहे, ते कांदा-लसूण यांचा वापर न करता काही चविष्ट पदार्थ बनवून खाऊ शकतात.

 जे लोक उपवास करत नाहीत पण ज्यांना सात्विक पदार्थ खाण्याची इच्छा आहे, ते कांदा-लसूण यांचा वापर न करता काही पदार्थ बनवून खाऊ शकतात.
जे लोक उपवास करत नाहीत पण ज्यांना सात्विक पदार्थ खाण्याची इच्छा आहे, ते कांदा-लसूण यांचा वापर न करता काही पदार्थ बनवून खाऊ शकतात.
नवी दिल्ली: महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीला भाविक आपल्या घरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करतात. त्याच्यासाठी चविष्ट व्यंजन बनवले जातात. या दिवसांमध्ये बहुतांश लोक उपवास करतात किंवा सात्विक भोजन खाणे पसंत करतात. जे लोक उपवास करत नाहीत पण ज्यांना सात्विक पदार्थ खाण्याची इच्छा आहे, ते कांदा-लसूण यांचा वापर न करता काही पदार्थ बनवून खाऊ शकतात. हे पदार्थ कोणते आहेत आणि त्यांची रेसिपी काय आहे ते जाणून घ्या.

गणेश चतुर्थीला बनवा सात्विक नाश्ता

  • तुम्ही आजवर कांदा-लसूणचा वापर केलेले छोले खूपदा खाल्ले असतील. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कांदा-लसूण यांचा वापर न करता छोले मसाला सुक्का बनवून पहा. उकडलेले छोले, तेल, मसाले आणि टोमॅटो प्युरी यांच्या मदतीने तुम्ही चविष्ट छोले मसाला सुक्का बनवू शकता.
advertisement
  • कांदा-लसूण यांचा वापर न करता तुम्ही घरच्याघरी क्रिस्पी चीज कॉर्न नगेट्स बनवू शकता. हे एक हेल्दी स्नॅक्स आहे. यासाठी तुम्हाला चीज, क्रीम, मका, तेल, रवा, कॉर्न फ्लोर, ब्रेड क्रम्स या सामग्रीची आवश्यकता आहे. मिश्रण एकत्र करून ते कॉर्न फ्लोरच्या घोळात बुडवावेत. यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून ते तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत.
  • जर तुम्हाला पराठे खायला आवडत असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही पनीर पराठा, मेथी पराठा, मुळ्याचा पराठा इत्यादी बनवू शकता. उदाहरणार्थ, गव्हाच्या पिठात मेथीची पाने, मीठ, तेल, ओवा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. याचे पराठे लाटून तव्यावर शेकून घ्या. गरमगरम पराठे दही किंवा चटणीसह खाऊ शकता.
  • तुम्ही व्हेजिटेबल सँडविच बनवून खाऊ शकता. टोमॅटो, चीज, बटर, इतर आवडीच्या भाज्या वापरून तुम्ही सँडविच बनवू शकता. ही रेसिपी तुम्ही केवळ 5 ते 10 मिनिटात तयार करू शकता.
  • सकाळच्या वेळेस तुम्ही स्प्राउट्स सलाडही खाऊ शकता. सणासुदीच्या काळात येणारा थकवा हे सलाड खाल्ल्याने कमी होऊ शकतो. तुम्ही कांदा किंवा लसूण न वापरता उकडलेल्या किंवा मोड आलेल्या कडधान्यांमध्ये लिंबाचा रस, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला, मिरची इत्यादी टाकून खाऊ शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ganesh Chaturthi: यंदाच्या गणेशोस्तवात सात्विक जेवणाला द्या हटके ट्विस्ट, कांदा-लसूण न वापरताही वाढेल चव
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement