What to Eat with Bajra: बाजरीची भाकरी खाताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान

Last Updated:

What to Eat with Bajra in Marathi: हिवाळ्यात बाजरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. मात्र बाजरीची भाकरी खाताना काळजी ही घ्यायलाच हवी अन्यथा ती आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

प्रतिकात्मक फोटो : बाजरीची भाकरी खाताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान
प्रतिकात्मक फोटो : बाजरीची भाकरी खाताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान
मुंबई: असं म्हणतात वेळ ही प्रत्येकाची येते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात असंच काहीसं झाल्यासारखं दिसून येतं. काही वर्षांपूर्वी काळा चहा किंवा कोऱ्या चहाला गरीबांचं पेय म्हणून हिणवलं जात होतं. ज्वारी, बाजरी सारखं धान्य हे गरीबांचं धान्य म्हणून त्याकडे पाहिलं जायचं. मात्र आता गव्हाच्या दुष्परिणामांमुळे अनेक जण ज्वारी, बाजरी, नाचणीच्या भाकरी खाऊ लागलेत. काही जण तर सगळी पिठं एकत्र करून मल्टीग्रेन पिठाच्या भाकरी किंवा चपात्या खाऊ लागले आहेत. गावरान मटनासोबत ज्वारीची भाकरी असली की फक्कड बेत जमतो. अनेक जण फिरायला गेले की, हॉटेलमध्ये ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाणं पसंत करतात. बाजरी ही आरोग्यासाठी गुणकारी आहे. हिवाळ्यात बाजरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात. मात्र बाजरीची भाकरी खाताना काळजी ही घ्यायलाच हवी अन्यथा ती आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.
बाजरी हे उष्ण प्रकृतीचं धान्य आहे. हिवाळ्यात बाजरी खाल्ल्याने शरीर आतून उबदार राहायला मदत होते. शिवाय बाजरीची भाकरी ही पोषणतत्वांनी परिपूर्ण आहे. बाजरीच्या भाकरीत प्रथिनं, फायबर आणि खनिजं भरपूर प्रमाणात याशिवाय बाजरीची भाकरी ही ‘ग्लूटेन फ्री’ आहे. त्यामुळे ती खाल्ल्याने वजन किंवा फॅटस् वाढत नाहीत. थंडीच्या मोसमात मोहरीची भाजी जी ‘सरसोका साग’ नावाने सुप्रसिद्ध आहे अशा मोहरीच्या किंवा हिरव्या पालेभाज्यांसोबत बाजरीची भाकरी चवीने खाल्ली जाते. बाजरी ही योग्य पदार्थासोबत खाल्ली तर तिच्या फायद्यांमध्ये नक्कीच वाढ होईल. मात्र चुकीच्या पदार्थांसोबत बाजरी खाल्ली तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement

चला तर मग जाणून घेऊया बाजरीच्या रोटीसोबत किंवा भाकरी सोबत काय खावं आणि काय टाळावं ते.

What to Eat with Bajra: बाजरीची भाकरी खाताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान
advertisement

बाजरीच्या भाकरी सोबत काय खाऊ नये?

मांसाहार:

ज्वारीप्रमाणे बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही मटनावर ताव मारण्याचा बेत करत असाल तर तो आत्ताच थांबावा. किंबहुना कोणत्याही प्रकाराचा मांसाहार करता बाजरी खाणं टाळा. बाजरी आणि मांसाहार हे स्वभावाने उष्ण आहेत. त्यामुळे एकाच वेळी उष्ण प्रकृतीच्या गोष्टी खाल्ल्याने शरीरात प्रचंड उष्णता निर्माण होऊन, जळजळ, ॲसिडिटी किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement

शाकाहार:

असं नाहीये की, फक्त मांसाहार करताना बाजरी खाणं हे धोक्याचं आहे. असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत ते उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे त्याबरोबर बाजरी खाणं हे धोक्याचं ठरू शकतं. छोले, काबूली चणे किंवा हरभऱ्याची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाणं टाळावं. कारण या भाज्या तयार करताना मसाल्यांचा जास्त वापर होतो. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ तुम्ही जर असं अन्न खात असाल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
advertisement

जंक फूड किंवा तेलकट पदार्थ:

अनेकांना वडा, समोस्या सोबत भाकरी किंवा चपाची खाण्याची सवय असते. मात्र बाजरीच्या भाकरीसोबत भजी, समोसा किंवा जास्त तळलेले खाणं टाळा. बाजरीच्या भाकरीत भरपूर फायबर्स असतात. खरं तर  ते अन्न पचायला मदत करतात. मात्र फायबर्स आणि तेलकट पदार्थ एकाचवेळी खाल्ल्यास पचनक्रियेत येते. त्यामुळे अपचानाचा त्रास होऊन गॅसेस, पोटफुगी किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय ज्यांना अल्सर, ॲसिडिटी आणि त्वचेशी संबंधित समस्या आहेत त्यांनी बाजरीच्या भाकरीचे सेवन करू नये.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
What to Eat with Bajra: बाजरीची भाकरी खाताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement