17-20 तासांचा प्रवास निम्म्यावर, मुंबई ते कोटा वाया मथुरा, सुस्साट धावणार कनेक्टिंग ट्रेन
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात 'मिशन रफ्तार' प्रकल्प अंतर्गत नागदा-मथुरा रेल्वे मार्गावर गाड्या 160 किमी प्रतितास वेगाने धावतील. प्रकल्पाचे 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रवासाचा वेळ 3.5 तासांनी कमी होऊन दिल्ली-मुंबई प्रवास 10 तासांत होणार आहे. प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल.
पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात ‘मिशन रफ्तार’ प्रकल्पांतर्गत नागदा-मथुरा विभागाच्या 545 किमी लांबीच्या ट्रॅकवर 160 किमी प्रतितास गतीने ट्रेन चालवण्यासाठी काम जोरात सुरू आहे. डीआरएम कोटा आणि चीफ प्रोजेक्ट मॅनेजर गती शक्ती यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी आहे.
रेल्वेने हा प्रकल्प डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागदा ते मथुरा दरम्यानचा प्रवास 3 तास 40 मिनिटांत पूर्ण होईल. सध्या, ट्रेन 130 किमी प्रतितास गतीने धावत असून, या अंतरासाठी 4 तास 20 मिनिटे लागतात.
सध्या या प्रकल्पाचे 91 टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच रेल्वे ट्रॅकवर येणारी जनावरे थांबवण्यासाठी 96 टक्के काम झाले आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे :
advertisement
- मथुरा-गंगापूर सिटी (152 किमी)
- गंगापूर सिटी-कोटा (172 किमी)
- कोटा-नागदा (221 किमी)
या प्रकल्पासाठी विद्युत, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी या तीन विभागांत काम सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई मार्गावरचा प्रवास केवळ 10 तासांत पूर्ण होऊ शकतो. यामुळे प्रवासी ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन आणि राजधानी एक्स्प्रेससह मालवाहतूक ट्रेनचे वेगही वाढतील.
advertisement
राज्यांसाठी महत्त्वाचे फायदे
- राजस्थानमधील कोटा, भरतपूर, सवाई माधोपुर हे स्टेशन महत्त्वाचे ठरणार.
- मध्य प्रदेशातील नागदा आणि रतलाम हे मोठे जंक्शन स्टेशन लाभदायक ठरतील.
- वेळ आणि प्रवास खर्च वाचेल.
रेल्वेच्या गतीत सुधारणा झाल्यामुळे, प्रवाशांचा वेळ सुमारे 3.5 तासांनी वाचेल. तसेच, या मार्गावर अधिक गाड्या चालवल्या जाऊ शकतील. मालगाड्यांचीही गती 160 किमी प्रतितास होईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/Travel/
17-20 तासांचा प्रवास निम्म्यावर, मुंबई ते कोटा वाया मथुरा, सुस्साट धावणार कनेक्टिंग ट्रेन