Gautala Abhayaranya: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! गौताळा अभयारण्य 3 महिने राहणार बंद, काय आहे कारण?

Last Updated:

Gautala Abhayaranya: अभयारण्य बघण्यासाठी जिल्ह्यातून पर्यटक येतात पण त्यासोबतच महाराष्ट्रातून ही पर्यटक हे अभयारण्य बघण्यासाठी येत असतात. अभयारण्य 3 महिन्यापर्यंत बंद असणार आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो. संभाजीनगर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यापैकीच एक महत्त्वाचे असणारे पर्यटन स्थळ म्हणजे गौताळा अभयारण्य. हे अभयारण्य बघण्यासाठी जिल्ह्यातून पर्यटक येतात पण त्यासोबतच महाराष्ट्रातून ही पर्यटक हे अभयारण्य बघण्यासाठी येत असतात. पावसाळा सुरू झाल्यामुळे हे अभयारण्य 3 महिन्यापर्यंत बंद असणार आहे.
पावसाळा प्राण्यांच्या मॅटिंग पीरियडसाठी (प्रजनन) महत्त्वाचा असतो. यादरम्यान प्राणी चिडचिड आणि आक्रमक होतात. परिणामी, पर्यटकांवर हल्ल्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यातील 3 महिने (जुलै-सप्टेंबर) गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या भागात गौताळा अभयारण्याची स्थापना 1986 मध्ये झाली. 17 गावातील वनक्षेत्राचा यात समावेश आहे. 260 चौ. किमी क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे. पावसाळ्यात हे अभयारण्य पाहण्यासारखे असते. परंतु, ऐन पावसाळ्यात हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असल्याच्या भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या.
advertisement
पावसाळा हा प्राण्यांच्या मॅटिंग पीरियडसाठी खास मानला जातो. या मॅटिंग पीरियडमध्ये पक्षी किंवा प्राणी चिडचिड करतातपर्यटकांनी अशा वेळी त्यांच्या मॅटिंग पीरियडमध्ये व्यत्यय आणला तर ते हल्ला करतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वनपाल समाधान पाटील यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Gautala Abhayaranya: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! गौताळा अभयारण्य 3 महिने राहणार बंद, काय आहे कारण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement