दिवाळीसाठी घरी जाताय पण रेल्वेचं तिकीट मिळत नाहीये, तुमच्यासाठी बेस्ट पर्याय काय?

Last Updated:

diwali travel options - घरी जाण्यासाठी इतर कुठल्या गाड्यांचे पर्याय आहेत व त्याचे दर किती आहेत याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक संदीप खारकर यांच्याशी संवाद साधला.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : दिवाळी हा वर्षातील सगळ्यात मोठा सण आहे आणि या सणाची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता लागलेली असते. बाहेरगावी राहणारा प्रत्येक जण हा आपल्या गावी जात असतो, अशा वेळी  रेल्वे आणि विमानाचे तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे घरी जाण्यासाठी इतर कुठल्या गाड्यांचे पर्याय आहेत व त्याचे दर किती आहेत याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक संदीप खारकर यांच्याशी संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सणाच्या काळात घरी जाणाऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पब्लिक ट्रन्सपोर्टवर सगळा भार पडतो. दिवाळीसाठी किंवा पर्यटनाला जाणाऱ्या लोकांना खासगी बसचा पर्याय उपलब्ध असतो. लक्झरी, बससारखे पर्याय असून यंदाच्या वर्षी 500 किलोमीटरच्या अंतरासाठी हे दर 1000 हजार ते 1200 रुपयांपर्यंत आहेत. तसेच या गाड्यांची सुविधा प्रत्येक शहरातून आहे.
advertisement
प्रत्येक गाडीनुसार प्रति किलोमीटरचे दर हे बदलत असतात. 17 सीटरपासून मिनी बस सुरू होते. यामध्ये नॉन एसी घेतली तर त्याचे दर हे 25 रुपये पर किलोमीटर आणि एसीचे दर 30 रुपये पर किलोमीटर आहेत. स्लीपरमध्ये 30 सीटर आणि 36 सीटरचा पर्याय असून एसीमध्ये 75 रुपये पर किलोमीटर आणि मल्टी एक्सल वोल्होमध्ये 120 रुपये पर किलोमीटर दर आहेत. महागाईमुळे दर थोडे वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे बजेट हे कोलमडलेले आहे. तरी देखील बसची बुकिंग ही सध्या फुल आहे, असे ते म्हणाले.
advertisement
सर्व गाड्या या निगडी, संगमवाडी या ठिकाणाहून जातात. तर काही नवले ब्रिज कात्रज मार्गे जातात. नांदेड, परभणी, त्या साईटला जाणाऱ्या गाड्या या कात्रज, पद्मावती मार्गे सोलापूरकडून जातात. तसेच अहमदननगर, औरंगाबाद, नाशिककडे जाणाऱ्या बसेस संगमवाडी किंवा निगडीकडून जातात. त्यामुळे कधीही, कुठेही जायचे असेल तर काही अडचणी न येता सर्वांना बस मिळतील, असे संदीप खारकर लोकल18 शी बोलताना म्हणाले.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
दिवाळीसाठी घरी जाताय पण रेल्वेचं तिकीट मिळत नाहीये, तुमच्यासाठी बेस्ट पर्याय काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement