Tourism: महाराष्ट्रातील 18 घरांचं छोटं गाव, ग्रामीण पर्यटनाचं आदर्श मॉडेल, केली स्वयंपूर्ण रोजगार निर्मिती, Video

Last Updated:

अतिशय दुर्गम आणि मूलभूत सुविधा नसलेल्या भागातून स्थलांतरित झालेले हे गावकरी, गावात शेती नसतानाही, आज गावातच ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण रोजगार निर्मिती करत आहेत. 

+
News18

News18

मुंबई : आपण नेहमीच ऐकत असतो की गावाकडून तरुण मंडळी मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वळतात, नोकरी-धंद्यासाठी गाव सोडतात. पण या सर्वांना अपवाद ठरतं कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोठणे हे केवळ 18 घरांचं छोटं गाव. अतिशय दुर्गम आणि मूलभूत सुविधा नसलेल्या भागातून स्थलांतरित झालेले हे गावकरी, गावात शेती नसतानाही, आज गावातच ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण रोजगार निर्मिती करत आहेत.
ग्रामीण पर्यटनाचं आदर्श मॉडेल
उदगीरपासून 8 किमी आत एका पायवाटेच्या भागात हे गाव होतं. मात्र या ठिकाणी दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या.
म्हणून 12 वर्षांपूर्वी या गावकऱ्यांनी शाहूवाडी तालुक्यातील वारूळ गावाजवळ नवीन वसाहत म्हणून गोठणे हे गाव वसवलं. पण इथं शेती नव्हती, रोजगार नव्हता. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी 2024 साली ग्राम पर्यटन उपक्रम सुरू केला. आणि आज केवळ 18 घरांचं हे गाव ग्रामीण पर्यटनाचं आदर्श मॉडेल ठरतंय.
advertisement
आज रोज 20 ते 25  पर्यटक इथं भेट देतात, तर शनिवार-रविवारी ही संख्या अधिकच असते. बाहेरच्या जिल्ह्यांतूनही लोक गावात फक्त फिरायला नाही, तर ग्राम संस्कृती अनुभवायला येतात.
advertisement
ग्राम पर्यटनामुळे गावातल्या प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती रोजगारात आहे. गावातल्या महिलांनी गोधडी शिवून, तर तरुणांनी गाई पालन, वस्तू विक्री, मार्गदर्शन यातून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. गोधडी शिवणं, नाचणीचे लाडू, पारंपरिक अन्नपदार्थ , हस्तकला वस्तूबाबूंच्या वस्तू , बैलगाडी सफर, गावभेट या सारख्या उपक्रमामुळे शहरी भागातून पर्यटक फक्त गाव पाहायला नाही तर गाव जगायला येतात. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत संपूर्ण उपक्रम पर्यटकांना खुला असतो.
advertisement
पुरेशी शेतजमीन नसतानाही गावाचं स्वाभिमान टिकवणाऱ्या गोठणेनं ग्राम पर्यटनाच्या माध्यमातून स्वावलंबन या संकल्पनेला खरी दिशा दिली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Tourism: महाराष्ट्रातील 18 घरांचं छोटं गाव, ग्रामीण पर्यटनाचं आदर्श मॉडेल, केली स्वयंपूर्ण रोजगार निर्मिती, Video
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement