GK : भारतातील कोणत्या राज्याला 'माउंटन स्टेट' म्हणून ओळखले जाते? निसर्गप्रेमी आणि संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं हे राज्य...

Last Updated:

हिमाचल प्रदेशला भारताचं 'पर्वतराज्य' म्हणून ओळखलं जातं. हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेलं हे राज्य डोंगराळ प्रदेश, सुंदर निसर्ग आणि धौलाधार पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील 28 राज्यं आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वेगळेपण महत्त्वाचं आहे. हिमालयीन पर्वतरांगा पर्यावरण आणि हवामानासाठी महत्त्वाच्या आहेत.

News18
News18
भारत हा भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत वैविध्यपूर्ण देश आहे. इथे पर्वतरांगा, वाळवंटं, नद्या आणि मैदानी प्रदेश आढळतात. याच भारतात हिमाचल प्रदेशला 'पर्वतराज्य' (माउंटन स्टेट) म्हणून ओळखलं जातं. हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेला हा राज्य निसर्गप्रेमींचं आकर्षण ठरतो.
हिमालय पर्वतरांगा त्यांच्या अद्वितीय सौंदर्यासाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखल्या जातात. या पर्वतरांगा परिसरातील हवामानावर परिणाम करतात आणि अनेक नद्यांचं उगमस्थान आहेत. शिवाय, या प्रदेशात वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती आढळतात, ज्यामुळे हा भाग निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठी महत्त्वाचा ठरतो.
advertisement
भारतामध्ये 28 राज्यं आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याला स्वतंत्र सरकार आहे, तर केंद्रशासित प्रदेश थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल ही मोठी आणि लोकसंख्येने जास्त असलेली राज्यं आहेत. दुसरीकडे, दिल्ली आणि चंदीगडसारखे केंद्रशासित प्रदेश लहान आहेत. भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पद्धतीनुसार भारताचे हे भाग विभागले गेले आहेत.
advertisement
हिमाचल प्रदेशला 'पर्वतराज्य' किंवा 'माउंटन स्टेट' म्हणून ओळखलं जातं. या राज्यात धौलाधार पर्वतरांगा आहेत, ज्या रावी आणि बियास नद्यांमध्ये विभागल्या जातात. जवळपास 16,807 गावं या राज्यात आहेत, ज्यापैकी बहुतांश गावं डोंगराळ आणि दरींच्या प्रदेशात वसलेली आहेत.
advertisement
हिमालय पर्वतरांगा भारताच्या 13 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरल्या आहेत. यात जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, आसाम, आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो. हिमालय रांगांना जगातील सर्वांत उंच आणि तरुण पर्वतरांगांपैकी एक मानलं जातं.
मराठी बातम्या/Travel/
GK : भारतातील कोणत्या राज्याला 'माउंटन स्टेट' म्हणून ओळखले जाते? निसर्गप्रेमी आणि संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं हे राज्य...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement