विमान प्रवासात महागड्या वस्तू विसरल्यास किंवा हरवल्यास काय करावे?, 'या' टीप्स फॉलो करा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो त्यावेळी आपण आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे. आपल्या छोटीशा चूकीमुळे फ्लाइटमध्ये आपले सामान राहू शकते.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
दिल्ली : जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि एअरलाइन तुमचे सामान विमानतळावरून उतरवायला विसरली किंवा तुमचा सामान गहाळ झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. विमान कंपनीमुळे तुमचे सामान हरवले तर तुम्ही काय करायला हवे, हे जाणून घेऊयात.
जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो त्यावेळी आपण आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे. आपल्या छोटीशा चूकीमुळे फ्लाइटमध्ये आपले सामान राहू शकते. आपल्यापैकी बरेच जण फ्लाइटमध्ये आपले सामान गमावतात. त्यामुळे तुम्ही घाबरायला लागतात. पण जर तुमचीही तीच फ्लाइट चुकली असेल, तर घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमचा सामान सहज परत मिळवू शकता.
advertisement
फ्लाइटमध्ये तुमचे कोणतेही सामान हरवले असेल आणि तुम्हाला ते सामान नंतर लक्षात आले असेल तर ती वस्तू हरवलीही जाऊ शकते. मात्र, विमान वाहतूक कंपन्यांकडून संपूर्ण मदत केली जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही घाबरून जाऊ नका आणि तुमच्या हरवलेल्या सामानाबाबत तातडीने एअरलाइनला कळवा.
धूम्रपान करणाऱ्यांनो सावधान! लवकरच धूम्रपान सोडले नाही तर होतील भयानक हाल
खूप दिवसांनी तुम्हाला तुमची वस्तूबाबत कळाले तर तुम्हाला तक्रार नोंदवावी लागेल. तुम्ही ही तक्रार ऑनलाइनही दाखल करू शकता. कधी हरवलेली वस्तू सापडते, तर कधी ती वस्तू सापडत नाही. तुमचे सामान कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या हाती लागले तर तुम्हाला तुमचे सामान सहज परत मिळेल.
Location :
Delhi
First Published :
January 27, 2024 6:51 PM IST
मराठी बातम्या/Travel/
विमान प्रवासात महागड्या वस्तू विसरल्यास किंवा हरवल्यास काय करावे?, 'या' टीप्स फॉलो करा