कोकण असो की गोवा कन्फर्म रेल्वेचं तिकीट मिळणार, उत्तर रेल्वेकडून मोठी घोषा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
पर्यटकांच्या नववर्ष स्वागतासाठी गोवा आणि कोकणात जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. नववर्षच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे.
सिंधुदुर्ग : नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक हे गोवा आणि कोकणाला पसंती देतात. यामुळे या प्रवाशांचा कल असतो तो कोकण रेल्वेकडे पाहायला मिळतो. सध्या तर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्याचे कायमच बुकिंग फुल्ल असते. याचा भार हा नेहमी कोकण रेल्वे वर पडत असतो. सध्या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक रेल्वेगाड्या या अगोदरच फुल्ल झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच प्रवाशांना दिलासा देणारी बातमी म्हणजे कोकणरेल्वे मार्गांवर उत्तर रेल्वेकडून एक नवीन गाडीची घोषणा ऐन नाताळच्या सणावर झाल्याने एक दिलासा मिळाला आहे.
त्यामुळेच पर्यटकांच्या नववर्ष स्वागतासाठी गोवा आणि कोकणात जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. नववर्ष च्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालविण्यात येणार आहे.
advertisement
निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल
गाडी क्रमांक 04082 हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस 28 डिसेंबर 2024 शनिवार रोजी हजरत निजामुद्दीन येथून 19.20 वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी 19.45 वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 04081 तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून 31 डिसेंबर 2024 मंगळवार रोजी 07.50 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 06.45 वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.
advertisement
डब्यांची रचना
एसी टू टायर कोच -05, एसी थ्री टायर कोच- 10, जनरल सेकंड क्लास कोच-02, सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन) -01 आणि लगेज कम ब्रेक व्हॅन- 01 या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिवीम या मोजक्याच स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे. या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक 25 डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
December 25, 2024 9:17 AM IST