Solapur News : प्रवाशांसाठी खुशखबर, सोलापूर ते गोवा विमान सेवा होणार सुरू, या तारखेला करा तिकीट बुकिंग
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सोलापूर विमानतळावरून गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
सोलापूर : सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सोलापूर विमानतळावरून गोव्याला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. 26 मे पासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होणार असून 16 मे पासून या विमानसेवेची तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
बहुप्रतिक्षित असलेली सोलापूरची विमानसेवा 26 मे पासून सुरू होत आहे. सोलापूर ते गोवा यामधील अंतर जवळपास 400 किलोमीटर पर्यंत आहे. सोलापूर ते गोवा महामार्गाने गेल्यास साधारण 7 ते 8 तास लागत होते. मात्र आता विमानसेवा सुरू झाल्याने तासभरात सोलापूर ते गोवा प्रवास करणं शक्य होणार आहे. तसा ई-मेल फ्लाय 91 एअरलाइन्सने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पाठवला आहे.
advertisement
16 मे पासून ऑनलाइन व सोलापूर विमानतळावर तिकीट बुकिंग सुरू होत आहे. गोव्यातून सोलापूरसाठी सकाळी 7.20 वाजता विमान उडेल. सोलापूरातून गोव्यासाठी 8.50 वाजता विमान उडेल. सोलापूरहून गोव्याला जाण्यासाठी सध्या ट्रॅव्हल्स बसची सुविधा उपलब्ध आहे. ट्रॅव्हल्स बसचे तिकीट दर 1700 ते 2000 रुपयेपर्यंत आहे. तर गोव्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल बस ने 7 ते 8 तास लागत होता. आता विमानसेवा सुरू झाल्यामुळे बराच वेळ प्रवाशांचा वाचणार आहे.सोलापूर विमानतळ आता पूर्णपणे सज्ज आहे. सर्व प्रकारच्या मान्यताही मिळाल्या आहेत. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्यात आता कसलाही अडथळा येणार नाही. 26 मे पासून सेवा सुरु होईल तसे विमान कंपनीने कळवले असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 30, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Solapur News : प्रवाशांसाठी खुशखबर, सोलापूर ते गोवा विमान सेवा होणार सुरू, या तारखेला करा तिकीट बुकिंग