Reservation असलं तरीही TT तुम्हाला रेल्वेतून खाली उतरवू शकतो, जाणून घ्या काय आहे नियम...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
रेल्वे प्रवासात तिकीट असूनही प्रवाशाला उतरवण्याचा अधिकार टीटीला आहे. जर प्रवाशाची तब्येत प्रवासासाठी योग्य नसल्याचे लक्षात आले, तर टीटी वैद्यकीय प्रमाणपत्र मागू शकतो. प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. टीटीच्या दुर्लक्षामुळे गंभीर घटना घडू नये यासाठी रेल्वेने ही व्यवस्था केली आहे.
रेल्वेत तिकीटाशिवाय प्रवास करणे हा कायद्याने गुन्ह आहे आणि टीटी अशा प्रवाशांना गाडीतून खाली उतरवू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तिकीट असतानाही टीटी तुम्हाला उतरवू शकतो? रेल्वे मॅन्युअलमध्ये असलेल्या एका विशिष्ट नियमामुळे टीटी कधीही प्रवाशाला खाली उतरवू शकतो. या नियमाला विरोध करण्याचा अधिकारही प्रवाशाला नसतो.
रेल्वे मॅन्युअल प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेले आहे. हे नियम अंमलात आणणे टीटीची जबाबदारी असते. रेल्वेचा प्राथमिक उद्देश म्हणजे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे. जर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष झाले, तर त्याचा फटका रेल्वे कर्मचाऱ्यांनाही बसू शकतो.
हे ही वाचा : Ajit Pawar : अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, पण विलासराव बेस्ट, अजित पवारांनी केलं कौतुक
advertisement
प्रवास सुरू होण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान, जर टीटीला असे वाटले की प्रवाशाची तब्येत ठीक नाही आणि तो प्रवास करण्याच्या स्थितीत नाही, तर टीटी त्या प्रवाशाला गाडीतून उतरवू शकतो. जर प्रवासादरम्यान त्या प्रवाशाची तब्येत आणखी खालावली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.
प्रवाशाकडे कोणत्याही वर्गाचे, अगदी फर्स्ट एसीचे तिकीट असले तरीही, जर प्रवाशाची प्रकृती ठीक नसल्याचे टीटीच्या लक्षात आले, तर तो त्याला प्रवास करण्यास मज्जाव करू शकतो. अशा परिस्थितीत, प्रवाशाने जर तिकीट दाखवून प्रवास करण्याची मागणी केली, तर टीटी त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मागू शकतो. प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रवासाला परवानगी दिली जाते.
advertisement
हे ही वाचा : Mobile Negative Energy: तुम्हीही लहान मुलांचे फोटो स्टेटस लावता? या गोष्टींमुळे होऊ शकतो पश्चाताप
प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून हा नियम तयार करण्यात आला आहे. जर प्रवाशाची तब्येत खराब असेल आणि टीटीने त्याला प्रवास करू दिले, तर प्रवासादरम्यान आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. गाडीत तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास प्रवाशाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. अशा परिस्थितीत, प्रवाशाची काळजी न घेतल्याबद्दल टीटीवर कारवाई होऊ शकते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याचा विचार करूनच हा महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2024 10:24 AM IST
मराठी बातम्या/Travel/
Reservation असलं तरीही TT तुम्हाला रेल्वेतून खाली उतरवू शकतो, जाणून घ्या काय आहे नियम...