Samruddhi Mahamarg : पावसाळ्यात समृद्धी महामार्ग नाही सोप्पा! स्पीड, वळण आणि धोके काय? हा Video पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात याची मोठी चर्चा होत आहे. पावसाळ्यात समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
जालना: समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. मुंबई ते नागपूर असे 701 किमी अंतर या महामार्गावरून केवळ आठ तासात कापता येते. परंतु समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात याचीही मोठी चर्चा होत आहे. महामार्गावर होत असलेल्या अपघातांसाठी ओव्हरस्पीडिंग हे एक महत्त्वाचे कारण आहे. समृद्धी महामार्गावर वाहन चालवताना आयडियल स्पीड काय आहे आणि पावसाळ्यात ती किती असावी? याबाबत आम्ही जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
समृद्धी महामार्ग हा एलिव्हेटेड मार्ग आहे. ज्यामुळे अनेकदा वाहन चालकांना आपल्या स्पीडचा अंदाज येत नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी वळणे आहेत. वाहनाची गती अधिक असल्यानंतर या वळणावरून देखील अपघात होण्याची शक्यता असते.
advertisement
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्ता आणि टायरमधील घर्षण बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असते. यामुळे समृद्धी महामार्गावर वाहन चालवण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या स्पीडपेक्षा 20 किमी प्रति तास कमी वेगाने वाहन चालवावे जेणेकरून गाडी स्किड होण्याची शक्यता कमी होते आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असं चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितलं.
advertisement
समृद्धी महामार्गावर चार चाकी वाहनांसाठी 120 किमी प्रति तास एवढी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर व्यावसायिक वाहनांसाठी 80 किमी प्रति तास एवढी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कार चालकांनी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना 100 किमी प्रति तास या वेगाने वाहन चालवावे. तर व्यावसायिक वाहन असल्यास 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने वाहनाची गती असावी, असंही उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 12, 2025 7:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Samruddhi Mahamarg : पावसाळ्यात समृद्धी महामार्ग नाही सोप्पा! स्पीड, वळण आणि धोके काय? हा Video पाहाच