आता चार्ट तयार झाल्यावरही प्रवाशांना रेल्वेचे तिकीट बुक करता येणार, जाणून घ्या नेमकं कसं

Last Updated:

रिझर्व्हेशनमध्ये करंट तिकीट आणि तत्काल रिझर्व्हेशनमध्ये फरक असतो.

फाईल फोटो
फाईल फोटो
गौरव सिंह, प्रतिनिधी
भोजपुर, 24 नोव्हेंबर : अनेकदा रेल्वेचा प्रवास करताना तिकीट नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. तिकीट न मिळाल्याने अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. अनेकांना दंडही भरावा लागतो. मात्र, आता चार्ट तयार झाल्यानंतरही प्रवाशी आपले तिकीट बुक करू शकतात. नेमकं कसं ते जाणून घेऊयात.
बिहारच्या हाजीपूर रेल्वे झोनच्या अंतर्गत दानापूर रेल्वे मंडळाला रेल्वेमध्ये आता फेसबुकच्या माध्यमातून खाली असलेल्या बर्थची माहिती दिली जाईल. चार तासांपूर्वी खाली असलेल्या सीटांबाबत प्रवाशांना घरबसल्या माहिती मिळणार आहे. रेल्वेच्या या उपक्रमाचा फायदा आरासह अनेक शहरांतील प्रवाशांना होणार आहे. आरक्षण तक्ता तयार झाल्यावर, रिक्त जागा वाटप केल्या जातात. सध्याचे आरक्षण: आरक्षण ऑनलाइन केले जात नाही आणि त्यासाठी स्टेशनवरील आरक्षण काउंटरवर जावे लागते. मात्र, दानापूर रेल्वे विभागातून सुटणाऱ्या गाड्यांची सद्यस्थिती कळविण्याची यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
advertisement
हाजीपूर रेल्वे झोनचे सीपीआरओ बीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, पाटणा, राजेंद्रनगर, दानापूर सह आरापर्यंत येथून सुरू होणाऱ्या रेल्वेंचे करंट स्टेटस फेसबुकच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता चार्ट तयार झाल्यावरही प्रवाशी आपल्या जवळच्या स्टेशनवरुन तिकीट करू शकतील. ट्रेन जिथून निघते, त्याच स्टेशनवरून सध्याचे आरक्षण करता येते. तसेच ट्रेन लेट असल्यास ट्रेन कोणत्या स्टेशनवरून जात आहे, हेसुद्धा यामुळे कळणार आहे.
advertisement
फेसबुकवर रेल्वेचे रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यावर ज्या सर्व सीट सर्व क्लासच्या खाली राहतात, त्याची माहिती मोबाईलवर येऊन जाईल. रिझर्व्हेशनमध्ये करंट तिकीट आणि तत्काल रिझर्व्हेशनमध्ये फरक असतो. तत्काल तिकीट हे रेल्वे निघण्याच्या एक दिवस आधी बुक केले जाते. तर करंट तिकीट त्या रेल्वेचा चार्ट तयार होण्यासाठी वाट पाहावी लागते. चार्ट तयार झाल्यावर जे सीट खाली राहतात, त्यांचे रिझर्व्हेशन हे करंट रिझर्व्हेशन असते. Eastern railway zone आणि DRM DANAPUR या फेसबुक पेजवर याबाबतची अपडेट दिली जाणार आहे.
advertisement
रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यावर प्रवाशांना असे वाटत होते की, आता त्या रेल्वेत रिझर्व्हेशनची शक्यता कमी आहे. रिझर्व्हेशन चार्ट हा ट्रेन निघण्याच्या चार तास आधी तयार होतो. यानंतरही जर करंटचे स्टेटस ऑनलाई माहिती झाले तर लोक आरामात स्टेशनवर जाऊन तिकीट बुक करू शकतात. रेल्वेच्या या निर्णयामुळे धावत्या गाड्यांमधील टीटीईची मनमानीही थांबणार आहे. सध्या आरा येथून आरा-रांची एक्स्प्रेस, आरा-टाटा नगर सुपरफास्ट, आरा-आनंद विहार पूजा विशेष ट्रेन या तीन गाड्या चालतात. या गाड्यांमध्ये, आरामधील प्रवासी आता फेसबुक पेजवरून माहिती घेऊन आरा स्टेशनवरून चार्ट तयार केल्यानंतरही तिकीट काढू शकतील.
मराठी बातम्या/Travel/
आता चार्ट तयार झाल्यावरही प्रवाशांना रेल्वेचे तिकीट बुक करता येणार, जाणून घ्या नेमकं कसं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement