शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी सरसावले पर्यावरण योद्धे, तब्बल 2 लाख वृक्षांची केली लागवड Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जालना शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी तब्बल 2 लाख वृक्षांची लागवड विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : बियाणे, दाल मिल, कपडा तसेच अन्य लहान मोठ्या उद्योगामुळे उद्योग नगरी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या जालना शहरात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र, मागील काही वर्षांमध्ये जालना शहर कात टाकत आहे. शहरातील रस्ते तसेच अन्य पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे. मात्र, शहरातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छता आढळून येते. याच गोष्टींवर मात करण्यासाठी जालन्यातील काही सामाजिक संस्था तसेच प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी तब्बल 2 लाख वृक्षांची लागवड विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या वृक्षांची निगा राखण्याची तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर राखण्याचा संकल्प जालनाकरांनी केला.
advertisement
जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा महापालिकेचा मानस
जालना शहरातील मंठा चौफुली ते गुरुबच्चन चौक हा शहरात येणारा प्रमुख मार्ग आहे. वन रोड वन ट्री या अंतर्गत महापालिकेने झाडांची लागवड केली आहे. रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लावण्यात आलेल्या वडाच्या झाडांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर घाण होती. शहरात येणाऱ्या नागरिकांना हे चित्र चांगले दिसत नव्हते. विविध सामाजिक संस्था सामाजिक जाण असणारे शहरातील नागरिक यांच्या माध्यमातून आपण येथे स्वच्छता मोहीम राबवली आहे. सी. एस. आर. फंड किंवा काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे, असं मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं.
advertisement
शिवजयंतीनिमीत्त फिटनेस फंडा; जालन्यातील ग्रुप करतोय मोठं काम Video
जालना शहर महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरात वर्षभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येतात. दर रविवारी शहरातील नागरिक या मोहिमांमध्ये श्रमदान करतात. शहरातील नागरिकांचा या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे. डीप क्लीनिंग म्हणजेच एखादा परिसर असा स्वच्छ करायचा की किमान दोन महिने हा परिसर पुन्हा घाण होणार नाही अशी संकल्पना राबवण्यात येत असल्याचं संतोष खांडेकर यांनी सांगितलं. महापालिकेला कर्मचारी संख्या आणि आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा मोहिमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी प्रयत्न करावे, असा आवाहन देखील खांडेकर यांनी केलं.
advertisement
Shiv Jayanti : शिवकालीन ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह; मोडी लिपितील दुर्मिळ ही पत्रे पाहिलेत का?
जालना शहरामध्ये आतापर्यंत तब्बल 2 लाख झाडांची लागवड झाली आहे. तब्बल सात ते आठ घनवन प्रकल्प तसेच वन रोड वन ट्री या माध्यमातून या वृक्षांची लागवड करण्यात आली आता उन्हाळ्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे झाडांची निगा राखने अत्यंत आवश्यक असल्याचं सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
February 19, 2024 4:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी सरसावले पर्यावरण योद्धे, तब्बल 2 लाख वृक्षांची केली लागवड Video