advertisement

Veg Biryani Recipe : परफेक्ट व्हेज बिर्याणी कशी बनवायची? मास्टरशेफच्या 5 टिप्स फॉलो करा, येईल हॉटेलसारखी चव!

Last Updated:

Veg Biryani Recipe In Marathi : घरी बनवली तर अनेकदा बिर्याणीऐवजी पुलावच तयार होतो. मग करायचं तरी काय? तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही हॉटेलसारखी बिर्याणी घरी बनवू शकत नसाल तर या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

परफेक्ट व्हेज बिर्याणी बनवण्याची पद्धत..
परफेक्ट व्हेज बिर्याणी बनवण्याची पद्धत..
मुंबई : सेलिब्रेशनच्या निमित्ताने जेवणात जर स्वादिष्ट बिर्याणी मिळाली तर आहाहा… प्रत्येकाच्या मनात हीच भावना येते. पण प्रत्येक वेळी रेस्टॉरंटमधून ऑर्डर देऊन ते मागवणं शक्य नसतं किंवा बऱ्याच जनांना ते आवडतही नाही. घरी बनवली तर अनेकदा बिर्याणीऐवजी पुलावच तयार होतो. मग करायचं तरी काय? तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही हॉटेलसारखी बिर्याणी घरी बनवू शकत नसाल तर मास्टरशेफ पंकज भदौरियांच्या या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात.
अलीकडेच मास्टरशेफने आपल्या यूट्यूब चॅनलवर परफेक्ट व्हेज बिर्याणी बनवण्याचे संपूर्ण गाइड शेअर केले आहे. शेफचा दावा आहे की, या एकाच व्हिडिओच्या मदतीने तुम्ही सर्व प्रकारच्या बिर्याणी सहज बनवू शकता आणि त्याला अप्रतिम चवही येईल. कारण बिर्याणी नॉनव्हेज असो किंवा व्हेज, ती बनवण्याचे बेसिक नियम एकसारखेच असतात.
बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
advertisement
बिर्याणीच्या भातासाठी लागणारे साहित्य : 3 कप बासमती तांदूळ, 2 तमालपत्र, 2 इंच दालचिनी, 2 काळी वेलची, 5-6 हिरवी वेलची, 4-5 लवंगा, 1 छोटा चमचा काळी मिरी, 4 छोटे चमचे मीठ, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 लिंबू, 15 कप पाणी.
बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या : 1/2 फुलकोबी, 2 गाजर, 1-2 सिमला मिरच्या, 200 ग्रॅम मशरूम, 200 ग्रॅम छोटे बटाटे, 1 कप मटार.
advertisement
बिरिस्तासाठी लागणारे साहित्य : 4 कांदे, तळण्यासाठी तेल.
मॅरिनेट करण्यासाठीचे साहित्य : 1 कप दही, पूड केलेली बिरिस्ता, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा काळी मिरी पूड, 1 छोटा चमचा जावित्री-वेलची पूड, 2 मोठे चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ.
भाज्या शिजवण्यासाठी लागणारे साहित्य : 4 मोठे चमचे तेल, 1 तमालपत्र, 1 छोटा चमचा जिरे, 2 इंच दालचिनी, 2 काळी वेलची, 5-6 हिरवी वेलची, 4-5 लवंगा, 1 दगडफूल, मॅरिनेट केलेल्या भाज्या.
advertisement
दमसाठी लागणारे साहित्य : केशराचे काही धागे (2 मोठ्या चमच्यांइतक्या गरम दुधात भिजवलेले), 1/4 कप पुदिन्याची पाने, 1/4 कप कोथिंबीर, 4 मोठे चमचे तूप, 1 मोठा चमचा गुलाबजल, 1 मोठा चमचा केवडा जल, 1/4 कप बिरिस्ता, 1 कप भाताचे पाणी,
बिर्याणी बनवण्याची पद्धत
- तांदूळ धुऊन 30 मिनिटांसाठी भिजत ठेवा.
- भाज्या मोठ्या तुकड्यांत कापून घ्या.
advertisement
- बिरिस्ता बनवण्यासाठी कांदे बारीक चिरून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि बाजूला काढा.
- भाज्या मॅरिनेशनसाठी दिलेल्या सर्व साहित्याबरोबर मिसळून 30 मिनिटांसाठी मॅरिनेट होऊ द्या.
- एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात अख्खे मसाले घाला. मसाले फुलू द्या आणि नंतर मॅरिनेट केलेल्या भाज्या घाला. 50 टक्के शिजेपर्यंत परतवा.
advertisement
- मोठ्या भांड्यात 15 कप पाणी उकळवा. त्यात मसाले, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस घालून तांदळाची पहिली लेयर मंद आचेवर शिजवा.
- लक्षात ठेवा, दुसरी लेयर भाज्यांची आणि तिसरी लेयर भाताची असेल.
- वरून बिरिस्ता, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, गुलाबजल, केवडा जल, भिजवलेले केशर, तूप आणि 1 कप उकडलेल्या भाताचे पाणी घाला.
advertisement
- झाकण पीठ लावून घट्ट बंद करा आणि 5 मिनिटे मोठ्या आचेवर, नंतर 20 मिनिटे मंद आचेवर शिजवा. 10 मिनिटे तसेच ठेवून मग झाकण उघडा. आता सर्व्ह करण्यासाठी गरमागरम बिर्याणी तयार आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Veg Biryani Recipe : परफेक्ट व्हेज बिर्याणी कशी बनवायची? मास्टरशेफच्या 5 टिप्स फॉलो करा, येईल हॉटेलसारखी चव!
Next Article
advertisement
Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन्  शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची Inside Story
  • राज्याच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री

  • ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नसून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या

View All
advertisement