उन्हातून मिळतं व्हिटॅमिन-D, पण किती वाजताच्या उन्हातून? अवश्य घ्या जाणून

Last Updated:

शरीरासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत गरजेचं असतं. हे ब्रेनसह नर्व्सला देखील जास्त अ‍ॅक्टिव्ह ठेवते. ज्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक आजारांपासून बचाव करतं.

व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी
मुंबई : शरीरासाठी व्हिटॅमिन डी हे अत्यंत गरजेचं असतं. हे ब्रेनसह नर्व्स देखील जास्त अ‍ॅक्टिव्ह ठेवते. ज्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक आजारांपासून बचाव करु शकतं. आज आपण एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत. ती म्हणजे उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं मात्र किती वाजताचं उन यासाठी फायदेशीर असतं? शरीरासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत गरजेचं असतं. हे शरीरातील मॅसेजिंग पॉवर वाढवण्याचं काम करतं. हे व्हिटॅमिन शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं. हे शरीरासाठी न्यूरोट्रांसमीटरप्रमाणे काम करतं यावरुनच तुम्ही याचा अंदाज लावू शकता.
व्हिटॅमिन डी ब्रेनपासून शरीराच्या प्रत्येक ऑर्गनला मॅसेज पाठवण्याचे काम करते. हे हार्मोनल हेल्थ राखण्यासाठी देखील कार्य करते.या व्हिटॅमिनची कमतरता असलेल्या लोकांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते. व्हिटॅमिन डीचा शरीरातील डोपामाइनच्या पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे आणि वेळेत त्याची भरपाई करणे सर्वात महत्वाचे आहे.
advertisement
सूर्यप्रकाश शरीराला व्हिटॅमिन डी कसा पुरवतो?
ज्यावेळी आपली स्किन सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा ती कोलेस्टेरॉलच्या कणांसोबत मिळते आणि व्हिटॅमिन डीमध्ये रूपांतरित होते. सूर्यप्रकाशातून उत्सर्जित होणारे अल्ट्राव्हायोलेट बी किरण एकत्र येऊन व्हिटॅमिन डी तयार होतात. या काळात टिश्यूज हा सूर्यप्रकाश शोषून घेतात. कोलेस्टेरॉलच्या कणांसोबत एकत्रित होऊन व्हिटॅमिन डी तयार होते.
advertisement
किती वाजेच्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं?
सकाळच्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळते. अल्ट्राव्हायोलेट बी किरण सकाळी 6 ते 9.30 दरम्यान उपलब्ध असतात. यानंतर सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी नसते. यानंतर बराच वेळ उन्हात बसूनही काही फायदा होत नाही.
advertisement
व्हिटॅमिन डीसाठी अशा प्रकारे सूर्यप्रकाश घ्या
तुम्ही दररोज 10 ते 20 मिनिटे उन्हात बसलात तर तुम्हाला व्हिटॅमिन डी सहज मिळू शकते. याशिवाय आठवड्यातून 3 दिवस 6 ते 9.30 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश घेतल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते. त्याचा मेंदू, झोप, त्वचा आणि केसांवर थेट परिणाम होतो. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
उन्हातून मिळतं व्हिटॅमिन-D, पण किती वाजताच्या उन्हातून? अवश्य घ्या जाणून
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement