Benefits of Facial Steaming: चेहऱ्यावर हवाय नैसर्गिक ग्लो? घरच्या घरी करा फेशियल स्टीमिंग, वाचा जबरदस्त फायदे
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
धावपळीच्या जीवनात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फेशियल स्टीमिंग एक सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. यामुळे त्वचेची छिद्रे उघडून खोलवर स्वच्छता होते, धुळ आणि...
Benefits of Facial Steaming: आजकालच्या धावपळीच्या जीवनात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेळ आणि पैसे खर्च करणे अनेकांना शक्य होत नाही. अशा वेळी घरच्या घरी करता येणारे फेशियल स्टीमिंग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. फेशियल स्टीमिंग हा त्वचेची निगा राखण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे त्वचा स्वच्छ होते, मऊ होते, आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते. चला तर मग, या लेखात फेशियल स्टीमिंगचे फायदे आणि ते घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
फेशियल स्टीमिंगचे फायदे
त्वचेची खोलवर स्वच्छता : हेल्थलाईनच्या एका रिपोर्टनुसार, वाफ घेतल्याने त्वचेची छिद्रे (Pores) उघडतात, ज्यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. चेहऱ्यावरील धुळ, घाण आणि मृत पेशी (Dead cells) बाहेर पडतात. ब्लॅकहेड्सची समस्या असेल, तर ती देखील सहज दूर होते.
रक्तप्रवाह वाढवतो : वाफ घेतल्यामुळे त्वचेतील रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो आणि रक्तप्रवाह वाढतो. यामुळे त्वचेला भरपूर पोषण मिळते आणि ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला होतो, ज्यामुळे चेहरा अधिक उजळ दिसतो.
advertisement
मुरुमांवर नियंत्रण : त्वचेच्या छिद्रांमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यामुळे मुरुमांची (Acne) समस्या निर्माण होते. वाफ घेतल्याने हे बॅक्टेरिया साफ होतात, ज्यामुळे मुरुम येण्यापासून बचाव होतो.
त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते : स्टीमिंगमुळे चेहऱ्यातील तेलाचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट आणि मॉइश्चराइज्ड राहते. तसेच, यामुळे कोलेजन (Collagen) आणि इलास्टिन (Elastin) चे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक तरुण आणि तजेलदार दिसते.
advertisement
स्टीमिंग घेण्याचे काही तोटे
अति उष्ण वाफेमुळे डोळ्यांमध्ये जळजळ, लालसरपणा किंवा सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच, जास्त उष्ण वाफेमुळे त्वचेची ॲलर्जी, लालसरपणा किंवा पुरळ येण्याचा धोकाही असतो.
- स्टीम घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
- वाफेचे तापमान खूप जास्त असू नये.
- वाफ घेताना चेहरा आणि डोके झाकून घ्या.
तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
advertisement
हे ही वाचा : Monsoon Hair Care : पावसाळ्यात केसगळती वाढलीय? पाहा 3 प्रमुख कारणं आणि सोप्या हेअर केअर टिप्स..
हे ही वाचा : Lip Colour : अचानक बदलतोय ओठांचा रंग? गंभीर आजारांच्या धोक्याचा असू शकतो इशारा, एक कलर तर थेट हार्ट अटॅकचा देतो संकेत
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2025 9:43 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Facial Steaming: चेहऱ्यावर हवाय नैसर्गिक ग्लो? घरच्या घरी करा फेशियल स्टीमिंग, वाचा जबरदस्त फायदे


