लग्नानंतर प्रेम कमी झालंय? वेळीच ओळखा हे ४ संकेत, नाहीतर होईल उशीर!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
लग्न... दोन अनोळखी व्यक्तींना आयुष्यभरासाठी एकत्र आणणारं एक सुंदर नातं. सुरुवातीला एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम, ओढ आणि आदर असतो. पण जशी जशी...
लग्न... दोन अनोळखी व्यक्तींना आयुष्यभरासाठी एकत्र आणणारं एक सुंदर नातं. सुरुवातीला एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम, ओढ आणि आदर असतो. पण जशी जशी वर्षे सरतात, तशा जबाबदाऱ्या वाढतात आणि कधीकधी या नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद-विवाद आणि मतभेद कधी मोठे होतात, हे कळतसुद्धा नाही आणि पती-पत्नीमध्ये नकळतपणे एक अंतर निर्माण होऊ लागतं.
तुमच्याही नात्यात असा दुरावा येत आहे का? तुमचा पार्टनर पूर्वीसारखा वागत नाहीये, असं तुम्हाला वाटतंय का? जर हो, तर वेळीच सावध व्हा. जेव्हा एखादं नातं कमकुवत होऊ लागतं, तेव्हा त्याची काही लक्षणं दिसायला लागतात. तुमच्या पार्टनरमध्ये जर खालील ४ गोष्टी दिसत असतील, तर समजून जा की तुमच्या नात्याचा पाया कमकुवत होत चालला आहे.
advertisement
१. आदराची जागा अपमानाने घेतली आहे का? कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असतो तो म्हणजे 'परस्पर आदर'. पण जर तुमचा पार्टनर तुमचा आदर करत नसेल, चार लोकांमध्ये तुमचा अपमान करत असेल, तुमच्या मताला किंमत देत नसेल किंवा सतत टोमणे मारून बोलत असेल, तर हा सर्वात मोठा धोक्याचा इशारा आहे. जिथे आदर संपतो, तिथे नात्याला तडा जायला सुरुवात होते.
advertisement
२. प्रत्येक गोष्टीवर संशय आणि विनाकारण राग? विश्वास हा नात्याचा श्वास असतो. पण जर तुमचा पार्टनर प्रत्येक पावलावर तुमच्यावर संशय घेत असेल, तुम्ही कुठे जाता, कोणाशी बोलता यावरून सतत चौकशी करत असेल आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून तुमच्यावर रागवत किंवा चिडचिड करत असेल, तर हे नातं आतून पोखरलं जात असल्याचं लक्षण आहे. अशा वातावरणात नात्यातील मोकळेपणा आणि प्रेम दोन्ही नाहीसे होते.
advertisement
३. एकत्र वेळ घालवणं टाळलं जातंय का? लग्नानंतर काही वर्षांनी जबाबदाऱ्या वाढतात हे खरं आहे, पण एकमेकांसाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत वेळ घालवणं मुद्दाम टाळत असेल, तुमच्याशी बोलण्याऐवजी फोन किंवा इतर कामांमध्येच जास्त व्यस्त राहत असेल, तर समजून जा की तुमच्यातील भावनिक अंतर वाढत चालले आहे.
advertisement
४. तुमची आणि मुलांची जबाबदारी टाळली जातेय का? संसार हा दोघांचा असतो आणि त्याची जबाबदारीही दोघांनी मिळून उचलायची असते. पण जर तुमचा पार्टनर तुमच्याकडे आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असेल, घरात काय चाललंय याच्याशी त्यांना काहीच देणं-घेणं नसेल, तर हे नातं एकतर्फी होत चालल्याचं स्पष्ट लक्षण आहे.
जर तुम्हाला तुमच्या नात्यात हे संकेत दिसत असतील, तर घाबरून न जाता त्यावर वेळीच काम करणं गरजेचं आहे. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधा आणि समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण वेळीच संवाद साधल्यास तुटण्याच्या मार्गावर असलेलं नातंही पुन्हा एकदा घट्ट होऊ शकतं.
advertisement
हे ही वाचा : पाठदुखीकडे दुर्लक्ष करताय? ही ५ लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा, नाहीतर होईल गंभीर परिणाम!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 12:47 PM IST