Health : अचानक छातीत दुखतंय, घाम येतोय? हार्ट अटॅक नाही 'या' आजाराचा आहे इशारा, वाचा लक्षणं
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
पॅनिक डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला तीव्र अस्वस्थता, चिंता आणि भीती जाणवू शकते. पॅनिक डिसऑर्डरची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊन तुम्ही ते रोखू शकता.
What Are The Causes And Symptoms Of Panic Attack : पॅनिक अटॅक म्हणजे अचानक आलेली तीव्र भीतीची आणि चिंतेची भावना. हा एक मानसिक आरोग्याचा विकार असला तरी, त्याची लक्षणे शारीरिक असू शकतात, ज्यामुळे अनेकदा लोक घाबरतात. पॅनिक अटॅक काही मिनिटांपासून अर्ध्या तासापर्यंत टिकू शकतो. अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय भीती वाटणे किंवा सतत एकच एक विचार केल्याने डोक्यावर ताण आल्याने ही समस्या उदभवू शकते.
पॅनिक अटॅकची लक्षणे
तीव्र भीती आणि चिंता : पॅनिक अटॅकचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे कोणतीही स्पष्ट कारण नसताना अचानक तीव्र भीती वाटणे. ही भीती इतकी तीव्र असते की, व्यक्तीला आपले नियंत्रण सुटत आहे किंवा आपण वेडे होत आहोत असे वाटते.
शारीरिक लक्षणे : यात हृदयाचे ठोके अचानक वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, खूप घाम येणे, थरथरणे आणि डोके हलके वाटणे यांचा समावेश होतो. काहीवेळा व्यक्तीला असे वाटते की त्याला हृदयविकाराचा झटका येत आहे.
advertisement
शरीरावर नियंत्रण सुटल्यासारखे वाटणे : अनेकदा व्यक्तीला असे वाटते की त्याचे स्वतःच्या शरीरावर नियंत्रण राहिलेले नाही आणि तो बेशुद्ध होईल. हे लक्षण खूप त्रासदायक असू शकते.
पॅनिक अटॅकची कारणे
मानसिक तणाव: सततचा मानसिक ताण आणि चिंता पॅनिक अटॅकचे प्रमुख कारण आहे.
अनुवांशिक कारणे: काहीवेळा पॅनिक अटॅक अनुवांशिक असू शकतो. जर कुटुंबात कोणाला पॅनिक डिसऑर्डर (Panic Disorder) असेल, तर इतरांनाही तो होण्याचा धोका असतो.
advertisement
बचावाचे उपाय
दीर्घ श्वास घेणे: जेव्हा पॅनिक अटॅक येतो, तेव्हा दीर्घ श्वास घेतल्याने हृदयाचे ठोके सामान्य होतात आणि मन शांत होते.
नियमित व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि ताण कमी होतो.
डॉक्टरांचा सल्ला: जर तुम्हाला वारंवार पॅनिक अटॅक येत असेल, तर त्वरित मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. योग्य औषधोपचार आणि थेरपीने यावर नियंत्रण मिळवता येते.
advertisement
दारू आणि कॅफिनपासून दूर राहा: दारू आणि कॅफिन सारख्या पदार्थांमुळे पॅनिक अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health : अचानक छातीत दुखतंय, घाम येतोय? हार्ट अटॅक नाही 'या' आजाराचा आहे इशारा, वाचा लक्षणं