Pune Crime : 1322 किलोमीटर लांब असून बंडू आंदेकरने आखला आयुषच्या हत्येचा प्लॅन! पुणे गँगवॉरचं 'केरळ' कनेक्शन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bandu Andekar kerala Connection : जेव्हा आयुषची हत्या झाली, त्यावेळी मी महाराष्ट्रात नव्हतो, मी त्यावेळी केरळमध्ये होतो. त्यामुळे आम्ही कट रचला असं म्हणता येणार नाही, असं बंडूने कोर्टात म्हटलं आहे.
Pune Crime Ayush Komkar Murder Case : पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या हत्याकांडाने पुणे शहरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. आयुष कोमकर याच्या हत्येमागे आयुषचे आजोबा आणि कुख्यात गुन्हेगार बंडू आंदेकर याचा सहभाग होता, असा आरोप आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी केली आहे. अशातच आता बंडूला जेव्हा कोर्टात हजर केलं गेलं, तेव्हा बंडूला कुटुंबाच्या मायेची पालवी फुटल्याचं दिसलं. मी माझ्या नातवाला का मारेल? असा सवाल बंडूने कोर्टासमोर उपस्थित केला. मात्र, सरकारी वकिलांनी जोरदार युक्तीवाद केल्याने बंडूला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मी तर केरळमध्ये होतो... - बंडू आंदेकर
जेव्हा आयुषची हत्या झाली, त्यावेळी मी महाराष्ट्रात नव्हतो, मी त्यावेळी केरळमध्ये होतो. त्यामुळे आम्ही कट रचला असं म्हणता येणार नाही. दत्ता काळे याने माझ नाव घेतलं नाही. आयुष माझा वैरी आहे का? माझ्या नातूच खून का करू मला काय मिळणार? असा सवाल बंडू आंदेकर याने कोर्टात विचारला. आम्हाला खोटा फिर्यादी बनवून या प्रकरणात अडकवले जात आहे. आमचे घरगुती वाद आहेत म्हणून देखील नाव घेतलं गेलं, असंही बंडू यावेळी म्हणाला.
advertisement
बंडू कोचीमध्ये... पोलिसांना टीप मिळाली
आयुषच्या हत्येनंतर बंडू आंदेकर परराज्यात पळून गेला होता. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिस ठाण्याचे पथक त्याचा शोध घेत होते. बंडू आंदेकर कोची येथे असल्याची माहिती आधी मिळाली होती. मात्र, अखेर बंडूला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात समृद्धी महामार्गावर सापळा रचून पकडण्यात आलं. मात्र, बंदू आंदेकरने केरळमधून बसून प्लॅन रचला का? की बंडू महाराष्ट्रातच होता? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
बंडू आंदेकरसह त्याची मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०, रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, डोके तालमीजवळ), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २२, रा. नाना पेठ) आणि तुषार नीलंजय वाडेकर (वय २६, रा. नाना पेठ) यांना अटक केली. अमन युसूफ पठाण ऊर्फ खान (रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) आणि सुजल राहुल मेरगू (वय २३, रा. नाना पेठ) यांना पुण्यातून अटक करण्यात आली.
advertisement
दरम्यान, या प्रकरणात एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९) आणि शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१, सर्वजण रा. नाना पेठ व डोके तालीम परिसर) हे आरोपी अजूनही फरारी आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 10, 2025 9:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 1322 किलोमीटर लांब असून बंडू आंदेकरने आखला आयुषच्या हत्येचा प्लॅन! पुणे गँगवॉरचं 'केरळ' कनेक्शन