Ajit Pawar: अजितदादांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती, आजचे सगळे कार्यक्रमही रद्द, कारण काय?

Last Updated:

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली.

अजितदादांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती, आजचे सगळे कार्यक्रमही रद्द, कारण काय?
अजितदादांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती, आजचे सगळे कार्यक्रमही रद्द, कारण काय?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली. त्यानंतर आज अजित पवारांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अचानकपणे अजितदादांचे कार्यक्रम रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी रात्री वरळी डोम येथे पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला अजित पवार गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. ही बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पक्षाच्या आगामी रणनीती, संघटनात्मक बदल आणि स्थानिक निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित पवार आजारी असल्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. अजित पवारांनी काल, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजेरी लावली  होती. त्यानंतर रात्रीच्या पक्षाच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते.

डीवायएसपी अंजना कृष्णा प्रकरणात मुख्यमंत्र्यांची नाराजी...

advertisement
करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून अजितदादांवर टीकेचे बाण सोडले जात असताना आता दुसरीकडे सरकारमध्येही अजितदादा एकटे पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. करमाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: अजितदादांची पक्षाच्या बैठकीला अनुपस्थिती, आजचे सगळे कार्यक्रमही रद्द, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement