Pune Crime: 'माझ्याकडे रागाने का बघतो?'; पुण्यात 9 जणांचा तरुणावर जीवघेणा हल्ला, रॉडने जबर मारहाण
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
१९ डिसेंबरच्या रात्री शेकोटी पेटवून मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या यासीन जब्बार शेख याला नऊ जणांच्या टोळीने अमानुषपणे मारहाण केली.
पुणे: हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. १९ डिसेंबरच्या रात्री शेकोटी पेटवून मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या यासीन जब्बार शेख याला नऊ जणांच्या टोळीने अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, यासीन शेख आणि त्याचे मित्र त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शेकोटी करून थंडीचा आनंद घेत होते. यावेळी आरोपी ओंकार झोंबाडे तिथे आला आणि त्याने 'तू माझ्याकडे रागाने का पाहतोयस?' असा जाब विचारत वादाला सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर झोंबाडेने आपल्या इतर ८ साथीदारांना बोलावून घेतले. यानंतर लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांनी यासीनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात यासीन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
सावधान! तुमच्या बँक खात्यावर जोडीदाराची नजर तर नाही ना? पुण्यात पतीनेच पत्नीला लावला दीड कोटीचा चुना
पोलिसांनी ओंकार झोंबाडे, तुषार काकडे, दाद्या बगाडे, शश्या ऊर्फ रोहन पिंगळे, किशोर काकडे, दीपू शर्मा, देव शिरोळे, मोन्या कुचेकर आणि कैलास काकडे यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरात दहशत माजवणाऱ्या अशा टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'माझ्याकडे रागाने का बघतो?'; पुण्यात 9 जणांचा तरुणावर जीवघेणा हल्ला, रॉडने जबर मारहाण









