सावधान! तुमच्या बँक खात्यावर जोडीदाराची नजर तर नाही ना? पुण्यात पतीनेच पत्नीला लावला दीड कोटीचा चुना

Last Updated:

आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने गुन्हेगारी वृत्तीचा वापर करत पत्नीच्या नकळत तिची खोटी सही केली आणि बनावट कागदपत्रे तयार केली. या आधारे त्याने विविध वित्तीय संस्थांकडून १७ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज उचलले.

पतीनेच पत्नीला लावला दीड कोटीचा चुना (AI Image)
पतीनेच पत्नीला लावला दीड कोटीचा चुना (AI Image)
पुणे : लग्नासारख्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी एका निर्दयी पतीने चक्क आपल्याच पत्नीचा विश्वासघात केला. पत्नीच्या पगाराचे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. मात्र, एवढ्यावरच न थांबता तिच्या नावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचे कर्ज काढून तिला कर्जबाजारी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नापासूनच फसवणुकीचा डाव:
ही घटना जून २०२३ पासून ते २० डिसेंबर २०२५ या अडीच वर्षांच्या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली. एका ३४ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नानंतर सुरुवातीला पत्नीच्या पगारातील सर्व रक्कम आपल्या व्यवसायात गुंतवली. मात्र, व्यवसायात नुकसान सोसावे लागल्यानंतर त्याने पत्नीला विश्वासात घेऊन ५८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडले.
advertisement
खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट कागदपत्रे: आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने गुन्हेगारी वृत्तीचा वापर करत पत्नीच्या नकळत तिची खोटी सही केली आणि बनावट कागदपत्रे तयार केली. या आधारे त्याने विविध वित्तीय संस्थांकडून १७ लाख ६४ हजार रुपयांचे कर्ज उचलले. अशा प्रकारे, पगाराची रक्कम आणि कर्जाचे पैसे मिळून आरोपीने पत्नीची एकूण १ कोटी ४० लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
advertisement
जेव्हा महिलेला आपल्या नावावर इतक्या मोठ्या रकमेचे कर्ज असल्याचे आणि पतीकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आले, तेव्हा तिने सांगवी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आयपीसीच्या संबंधित कलमांनुसार फसवणूक, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सांगवी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या गुन्ह्यात आरोपीला बँकेतील कोणी मदत केली आहे का, याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सावधान! तुमच्या बँक खात्यावर जोडीदाराची नजर तर नाही ना? पुण्यात पतीनेच पत्नीला लावला दीड कोटीचा चुना
Next Article
advertisement
BMC Election: युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, नंतरच घोषणा?
युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, त्यानंतरच..
  • युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, त्यानंतरच..

  • युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, त्यानंतरच..

  • युतीचं घोडं कुठं अडलं? 'राज की बात', ठाकरे गटासमोर मनसेची एक अट, त्यानंतरच..

View All
advertisement