Ajit Pawar : आधी पुण्यात डझनभर मोहरे फोडले, आता वेळ पिंपरी चिंचवडची! दादांना धक्का देण्याचा भाजपचा नवा प्लॅन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PCMC Election Ajit Pawar : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची झाली आहे. भाजप आमदार शंकर जगताप यांनी अजित पवार यांना थेट आव्हान दिलंय.
Pimpari Chichwad Municipal Election (गोविंद वाकडे, प्रतिनिधी) : एकीकडे पुणे महानगरपालिकेसाठी अजित पवार गट आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने अजित पवार यांना डिवचण्यास सुरूवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच भाजप आमदार शंकर जगताप यांनी अजित पवार यांना थेट आव्हान दिलंय.
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है.. म्हणत पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. कारण नुकतच राष्ट्रवादीतील माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह 20 पेक्षा अधिक पदाधिकारी नगरसेवनकचा भाजपने प्रवेश करून घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीतील आणखी काही माजी नगरसेवकांचा प्रवेश करून घेणार असल्याचा इशारा भाजपकडून देण्यात येतोय.
advertisement
उमेदवारांना पायघड्या का घालतंय?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी अजित पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. मात्र ,असं असलं तरीही भाजपकडे तुल्यबळ उमेदवार असतांना, भाजप इतर पक्षातील उमेदवारांना पायघड्या का घालतंय? या प्रश्नावर भाजपच्या नेत्यांची कोंडी होताना दिसततीय. विकासाच्या मुद्द्याला धरून इनकमिंग सुरू असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय.
advertisement
भाजप 100 पार गेलेली दिसेल
दरम्यान, महायुतीकडून युती करावी असे कोणतेही निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले नाहीत. परंतू भाजप आणि शिवसेना यांच्यात युती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं म्हणत शंकर जगताप यांनी अजित पवार गटासोबत कोणतीही युती होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. येत्या 16 तारखेला भाजप 100 पार गेलेली दिसेल, असं शंकर जगताप म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 11:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : आधी पुण्यात डझनभर मोहरे फोडले, आता वेळ पिंपरी चिंचवडची! दादांना धक्का देण्याचा भाजपचा नवा प्लॅन









