प्रचार रॅलीसाठी 500, बाईक रॅलीसाठी 1500 रुपये, निवडणुकीच्या धामधुमीनं नाका कामगारांना 'अच्छे दिन'!

Last Updated:

Municipal Election : महापालिका निवडणुकांच्या प्रचारामुळे नवी मुंबईतील नाका कामगारांना मोठा रोजगार मिळत आहे. प्रचार रॅली, फलक उभारणी आणि गर्दी जमवण्यासाठी कामगारांची मोठी मागणी वाढली असून बांधकाम क्षेत्रात तुटवडा जाणवतो.

News18
News18
मुंबई : महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शहरातील नाका कामगारांसाठी सध्या सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल होण्यापासून ते मतदानाच्या दिवशीपर्यंत प्रचारयंत्रणा पूर्ण क्षमतेने राबवण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर मजुरांची मागणी वाढली आहे. याचा थेट फायदा रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कष्टकरी वर्गाला होत आहे.
नवी मुंबईत विविध भागांत असलेल्या कामगार नाक्यांवर दररोज सकाळी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेली गर्दी दिसते. मात्र सध्या या नाक्यांवरील कामगारांची संख्या कमी झालेली आहे. कारण काही कामगार प्रचार कामात गुंतलेले आहेत. ज्यात प्रचार पत्रके वाटप, फलक उभारणी, रॅलीसाठी गर्दी जमवणे, घोषणा देणे, वाहनांवर झेंडे लावणे अशा अनेक कामांसाठी नाका कामगारांचा वापर केला जात आहे.
advertisement
प्रचारापासून ते बाईक रॅलीचे दर काय?
राजकीय पक्षांनी प्रचारासाठी ठराविक मानधन ठरवले आहे. पुरुष कामगारांना दिवसाला 500 ते 700 रुपये तर वाहनासह सहभागी झाल्यास अधिक रक्कम दिली जाते. महिला कामगारांनाही प्रचार रॅलींमध्ये प्राधान्य दिले जात आहे. नाष्टा, प्रवास आणि कधी कधी जेवणाची सोयही केली जाते.
यामुळे बांधकाम क्षेत्रात मात्र मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही प्रकल्पांचे काम सावकाश झाले असून कंत्राटदार अडचणीत आले आहेत. निवडणूक काळात रोजगाराची हमी मिळाल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर परिस्थिती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
प्रचार रॅलीसाठी 500, बाईक रॅलीसाठी 1500 रुपये, निवडणुकीच्या धामधुमीनं नाका कामगारांना 'अच्छे दिन'!
Next Article
advertisement
Nagar Parishad Results: थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी कोण?
थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को
  • थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को

  • थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को

  • थेट निवडलेले नगराध्यक्ष, पण सत्ता दुसऱ्याच पक्षाची! नगर परिषदांचा खरा कारभारी को

View All
advertisement