Samosa Jalebi Health Risks : 15 दिवस रोज समोसा-जिलेबी खाल्लं तर काय होईल? तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

Last Updated:

Samosa Jalebi Health Risks : अनेकांच्या मनात यासंबंधीत भीती आणि अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. ज्यामध्ये समोसा आणि जिलेबी खाल्ली तर नेमकं काय होईल? किंवा ते शरीराच्या कोणत्या भागावर किंवा कसे परिणाम करतात? शिवाय 15 दिवस रोज खाल्लं, तर काय होऊ शकतं? चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चव आणि वेग या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे झटपट खाल्लं जाणारं जंक फूड विशेषतः समोसा आणि जलेबी सारखे पदार्थ अनेकांच्या रोजच्या खाण्याचा भाग झालं आहे. अगदी नाश्त्याला समोसा आणि गोडात जलेबी खाणं तर काही ठिकाणी एक परंपराच बनली आहे. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार दररोज समोसा-जलेबी खाणं हे सिगरेट ओढण्याइतकंच किंबहुना त्याहून अधिक घातक ठरू शकतं. या संशोधनानंतर जिलेबी आणि समोसा चर्चेत आले. सोशल मीडियावर ते ट्रेंड होऊ लागले आणि त्याचे मीम्स देखील फिरु लागले आहेत.
पण आता अनेकांच्या मनात यासंबंधीत भीती आणि अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. ज्यामध्ये समोसा आणि जिलेबी खाल्ली तर नेमकं काय होईल? किंवा ते शरीराच्या कोणत्या भागावर किंवा कसे परिणाम करतात? शिवाय 15 दिवस रोज खाल्लं, तर काय होऊ शकतं? चला याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ.
भारतीय आरोग्य मंत्रालयाने नुकतंच सर्व सरकारी संस्था आणि कार्यालयांमध्ये ‘ऑईल आणि शुगर बोर्ड’ लावण्याचे आदेश दिले आहेत. यामागचा उद्देश आहे की, लोकांना त्यांच्या रोजच्या खाण्यात किती तेल आणि साखर जात आहे, याची जाणीव व्हावी. ही माहिती शाळा, कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांमध्ये लावण्यात येणार असून फॅट आणि साखरेचं प्रमाण थेट समजेल, जेणेकरून लोक जागरूक होतील.
advertisement
100 ग्रॅम समोसामध्ये सुमारे 261 कॅलोरीज, 17 ग्रॅम फॅट आणि 423 मिग्रॅम सोडियम असतो. तर 100 ग्रॅम जलेबीमध्ये तब्बल 300 कॅलोरीज, 58 ग्रॅम कार्ब्स आणि 7 ग्रॅम फॅट असते. रोज या प्रमाणात हे पदार्थ खाल्ले गेले, तर त्याचे परिणाम लिव्हर, हृदय आणि मेंदूवर सुद्धा होऊ शकतात.
15 दिवस रोज खाल्लं, तर काय होईल?
advertisement
बंगळुरूच्या स्पर्श हॉस्पिटलचे लिव्हर तज्ज्ञ डॉ. गौतम कुमार म्हणतात, “जर कोणी 15 दिवस रोज समोसा आणि जलेबी खाल्ले, तर लगेच मोठा त्रास होणार नाही. पण काही महिने हेच सातत्याने खाल्लं तर फॅटी लिव्हर, कोलेस्टेरॉल वाढणं, उच्च रक्तदाब, वजन वाढ, आणि डायबेटीस यांसारखे आजार शरीरात सुरू होतील.”
या पदार्थांमध्ये अत्यधिक ट्रान्स फॅट आणि साखर असते. हे फॅट शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवते, ज्यामुळे शरीर साखर नीट पचवू शकत नाही आणि ती साठवली जाते. परिणामी जाडपणा वाढतो. डॉ. कुमार म्हणतात, “यामुळे मूड स्विंग, मेंदूचं कार्य मंदावणं आणि सतत थकवा येणं हे देखील दिसू शकतं.”
advertisement
हृदयविकाराचा धोका
दिल्लीतील श्री बालाजी हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. अमर सिंघल यांचं म्हणणं आहे की, “समोसा आणि जलेबीमधील ट्रान्स फॅट्स हे एलडीएल (वाईट कोलेस्टेरॉल) वाढवतात आणि एचडीएल (चांगलं कोलेस्टेरॉल) घटवतात, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक यांचा धोका वाढतो.”
सिगरेटपेक्षा घातक का मानलं जातं?
अलीकडे झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार, दररोज समोसा-जलेबी खाणं हे दीर्घकाळात सिगरेटच्या सेवनापेक्षा अधिक घातक ठरू शकतं, कारण त्यात असलेल्या ट्रान्स फॅट्स आणि साखरेचा शरीरावर परिणाम दीर्घकालीन व गंभीर असतो. आणि ही सवय एकदा लागली, की ती मोडणं कठीण जातं.
advertisement
समोसा-जलेबी म्हणजे एक आनंददायी क्रेव्हिंग! पण ती रोजच्या आहारात असेल, तर ती क्रेव्हिंग नव्हे, सवय बनते आणि ही सवय तुमचं आरोग्य हळूहळू संपवत जाते. म्हणूनच, चव आणि आरोग्य यामध्ये योग्य तो बैलन्स साधणं आजच्या काळात अत्यावश्यक आहे.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Samosa Jalebi Health Risks : 15 दिवस रोज समोसा-जिलेबी खाल्लं तर काय होईल? तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement