Do You Know: वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचं काय करायचं? असा करता येईल पुनर्वापर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
RO वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे पाणी दुषित असले तरी आपण अन्य कामासाठी याचा वापर करू शकतो.
मुंबई: आजकाल बहुतांश घरांमध्ये आरओ वॉटर प्यूरिफायरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या यंत्राच्या मदतीने पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य बनवते. यामुळे दुषित पाणी प्यायल्यामुळे होणारे अनेक आजारांपासून बचाव करता येते. दरम्यान या यंत्रामुळे अनेकांना एका सामान्य समस्येचा सामना करावा लागतो. ती समस्या म्हणजे हे यंत्र पाणी स्वच्छ करत असताना मोठ्या प्रमाणावर दुषित पाणी बाहेर पडत असते. अनेकजण हे पाणी फेकून देतात. यामुळे पाणी तर वाया जातेच पण त्याचबरोबर पर्यावरणाचीही हानी होते. मात्र तुम्हाला माहित आहे का की हे पाणी आपण वेगवेगळ्या कामांसाठी वापरून पाण्याची बचतही करू शकतो.
आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे पाणी दुषित असले तरी आपण अन्य कामासाठी याचा वापर करू शकतो. या पाण्याचा पुनर्वापर कसा करावा जाणून घ्या.
बाग सिंचन करण्यासाठी उपयुक्त
या पाण्याचा वापर बाग सिंचन करण्यासाठी करता येऊ शकतो. या पाण्यामध्ये मिनरल्स आणि क्षारांचे प्रमाण अधिक असते. यामुळे त्यांचा वापर थेट झाडांवर करू नये. तर सामान्य पाण्यामध्ये हे पाणी मिसळून याचा वापर करावा. जेणे करून झाडांचे नुकसान होणार नाही. ज्या झाडांमध्ये क्षार शोषून घेण्याची क्षमता अधिक असते, त्या झाडांवर या पाण्याचा वापर करता येऊ शकतो.
advertisement
फरशी पुसण्यासाठी करता येईल वापर
आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचा वापर फरशी पुसण्यासाठी करता येऊ शकतो. पाण्यामधील मिनरल्स आणि क्षारांमुळे फरशीवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे पाण्याची बचतही करता येईल.
वाहने धुण्यासाठी उपयुक्त
कार, बाईक्स यांसारखी वाहने धुण्यासाठी भरपूर पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघालेले पाणी कामी येऊ शकते. जर पाण्यामध्ये मिनरल्सचे प्रमाण जास्त असल्यास वाहन धुवून झाल्यावर ते पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
advertisement
टॉयलेट फ्लश
आरओ वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचा वापर टॉयलेट फ्लशमध्ये करता येऊ शकतो. टॉयलेट फ्लशसाठी भरपूर पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत हे पाणी कामी येऊ शकते आणि स्वच्छ पाण्याची बचतही करता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2024 1:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Do You Know: वॉटर प्यूरिफायरमधून निघणाऱ्या पाण्याचं काय करायचं? असा करता येईल पुनर्वापर