फक्त 100 रुपयात ट्रेण्डी शर्ट; कपडे घेताना बजेटचं No Tension

Last Updated:

महागड्या शॉपिंगमुळे येणारा खिशावरचा ताण कमी करायचा असेल तर मुंबईतल्या एका स्वस्त दुकानाची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत

+
News18

News18

मुंबई, 21 ऑगस्ट : महिलांप्रमाणेच पुरुषांच्या कपड्यांचेही आता वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ब्रँडकडून त्याचं आक्रमक मार्केटिंग केलं जातंय. त्याची किंमतही चांगलीच असते. या महागड्या शॉपिंगमुळे येणारा खिशावरचा ताण कमी करायचा असेल तर मुंबईतल्या एका स्वस्त दुकानाची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये शर्टची खरेदी करता येईल.
मुंबईतल्या मुलुंड मार्केटमधल्या वाइल्ड शॉप या ठिकाणी पुरुषांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेण्डी कपडे मिळतात. हे पुरुषांच्या कपड्याचं होलसेलमध्ये विक्री करणारं दुकान आहे. इथं सध्या ट्रेन्डमध्ये असलेले फॅन्सी शर्ट, चायनीज कॉलर शर्ट, चेक्स शर्ट असे अनेक प्रकारचे शर्ट फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
फॅन्सी शर्टच नव्हे तर फॉर्मल ऑफिसमध्ये घालण्यासाठी लागणारे डिसेंट फॉर्मल कपडे देखील या ठिकाणी मिळतील. त्याचबरोबर पार्टीवेअर देखील या ठिकाणी स्वस्त दरात खरेदी करु शकता, अशी माहिती या दुकानाचे मालक इम्रान सरवैया यांनी दिली.
advertisement
आम्ही बेंगलुरूमधून मोठ्या प्रमाणात कपडे आणतो. तिथं ते स्वस्त दरात मिळतात. त्यामुळेच आम्ही 100 रुपयात शर्ट ग्राहकांना देऊ शकतो. हा शर्ट खरेदी करण्यासाठी इथं मोठी गर्दी असते, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त 100 रुपयात ट्रेण्डी शर्ट; कपडे घेताना बजेटचं No Tension
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement