'अरे आळस येतोय यार...' सहकाऱ्याला असं बोलतो खरं, पण ऑफिसमध्ये Lunch नंतरच का येते जास्त झोप?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी विचार केलाय का की ही झोप ऑफिसमध्ये जेवणानंतर येतेच कशी?
मुंबई : दुपारचे जेवण झाल्यावर किंवा फस्ट हाफनंतर अनेकांना ऑफिसमध्ये झोप येते. काही जण तर आपल्या ऑफिसमधील मित्राला हे सांगतात आणि त्यासाठी काय करता येईल? असे प्रश्न विचारतात. ज्यावर तोडं धूवून ये, पाणी पी, चहा किंवा कॉफी पी असे उपाय मित्रांकडून हमखास मिळतात. पण कधी विचार केलाय का की ही झोप ऑफिसमध्ये जेवणानंतर येतेच कशी?
झोप येण्याची कारणं काय आहेत, चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ
अन्न पचवण्याची प्रक्रिया: जेवण झाल्यावर आपलं शरीर अन्न पचवण्यात व्यस्त असतं. यासाठी शरीरातील रक्त आपल्या पोटाकडे जातं. त्यामुळे मेंदूला जाणारं रक्त कमी होतं आणि आपल्याला थोडीशी झोप येते.
रक्तातील साखरेची पातळी: जेवण केल्यावर रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि नंतर कमी होते. यामुळेही आपल्याला थकवा जाणवू शकतो.
advertisement
शरीराला विश्रांतीची गरज: दिवसभर काम करत असल्याने आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. जेवणानंतर शरीराला थोडीशी विश्रांती मिळाल्याने आपल्याला झोप येऊ शकते.
जेवणानंतरची उष्णता: जेवणानंतर शरीराचं तापमान वाढतं. यामुळेही आपल्याला थोडं गरम झालेलं देखील जाणवू शकतं आणि झोप येऊ शकते.
कामाचा ताण: दिवसभर काम करत असल्याने आपल्यावर मानसिक ताण येतो. जेवणानंतर हा ताण थोडासा कमी होतो आणि आपल्याला झोप येऊ शकते.
advertisement
झोप येण्यापासून कसे थांबवावे?
जेवण हलकं करा: जास्त तेलकट आणि मसालेदार जेवण खाऊ नका.
जेवणानंतर भरपूर पाणी प्या.
जेवणानंतर थोडं चालणं फायद्याचं आहे.
झोप न येण्यासाठी काहीतरी वाचू शकता किंवा एखाद्या सहकाऱ्याशी बोलू शकता.
काम बदलून घ्या: जर तुम्हाला झोप येत असेल तर, काम बदलून घ्या. सकाळ पासून करत आलेलं काम थांबवा आणि दुसरं काम करायला घ्या.
advertisement
महत्त्वाचं: जर तुम्हाला नेहमीच झोप येत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2024 7:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'अरे आळस येतोय यार...' सहकाऱ्याला असं बोलतो खरं, पण ऑफिसमध्ये Lunch नंतरच का येते जास्त झोप?


