advertisement

Environment Day: एक कृती बदलेल जगाचं भविष्य, पर्यावरण रक्षणासाठी तुमचं योगदान महत्त्वाचं, काय कराल?

Last Updated:

Environment Day: दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळ्या थीम ठेवण्यात येतात. 2025 च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘प्लास्टिक प्रदूषण संपवा’ अशी आहे.

+
Environment

Environment Day: गोष्ट छोटी पण घडेल मोठा बदल, पर्यावरण रक्षणासाठी तुमचंही योगदान महत्त्वाचं, काय कराल?

अहिल्यानगर: 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी आणि संवर्धनाविषयी लोकांमध्ये जागृत निर्माण करण्याचा दिवस आहे. संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने 1972 मध्ये स्टॉक होम येथे मानवी पर्यावरण परिषद झाली. त्यानंतर 1974 पासून 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळ्या थीम ठेवण्यात येतात. 2025 च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘प्लास्टिक प्रदूषण संपवा’ अशी आहे. ही थीम सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करणे, अशी आहे. यासाठी #beatplasticpollution या हॅश टॅगसह या मोहिमेचा प्रचार केला जात आहे.
advertisement
जागतिक पर्यावरण दिनी हे करा
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काय करू शकतो? असा प्रश्न अनेकांना असेल. तर झाडे लावणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, ऊर्जेची बचत करणे, पाण्याचा योग्य वापर करणे, पर्यावरण पूर्वक सवय लावून घेणे व इतरांना पर्यावरणाबद्दल प्रोत्साहित करू शकतो. या काही छोट्या गोष्टी करून आपण पर्यावरण दिन साजरा करू शकतो.
advertisement
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिन आपल्याला आपली पृथ्वी हे आपले घर आहे आणि तिचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, याची आठवण करून देतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Environment Day: एक कृती बदलेल जगाचं भविष्य, पर्यावरण रक्षणासाठी तुमचं योगदान महत्त्वाचं, काय कराल?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement