लग्नासाठी करा शॉपिंग, लहानग्यांचे सुंदर कपडे फक्त 350 रुपयांपासून, दादरमधील याठिकाणी करा खरेदी
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सध्या लग्नाचा सीजन सुरू असल्यामुळे यावेळी घालण्यासाठी ट्रॅडिशनल कपडे तर सगळ्यांनाच आवडतात. तुम्हालाही तुमच्या लहानग्यांसाठी सुंदर साडीचे ड्रेस, फ्रॉक हवे असतील तर दादर मधील हे दुकान तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या लग्नाचा सीजन सुरू असल्यामुळे यावेळी घालण्यासाठी ट्रॅडिशनल कपडे तर सगळ्यांनाच आवडतात. पण ते कपडे जर लहान मुलं मुलींचे असतील तर ते कपडे आणखीच सुंदर दिसतात. तुम्हालाही तुमच्या लहानग्यांसाठी सुंदर साडीचे ड्रेस, फ्रॉक हवे असतील तर दादरमधील हे दुकान तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
दादर पश्चिम येथील रानडे रोड येथे असणारे साई गणेश कलेक्शन हे दुकान लहान मुलांच्या सुंदर ड्रेसेससाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला हव्या त्या प्रकारची लहान मुलींचे आणि मुलांचे ट्रॅडिशनल कपडे मिळतील. खणाच्या साडीचे ड्रेसेस, पैठणी साडीचे ड्रेसेस, छोटी नऊवारी साडी, खणाच्या साडीचे फ्रॉक, लेहंगा हे सुंदर लहान मुलींचे ड्रेस या दुकानात मिळतात.
advertisement
यामध्ये फ्रॉक, परकर ब्लाऊज, साडी या सगळ्यांचा समावेश आहे. सध्या याच पारंपारिक कपड्यांवर लहान मुलींचे फोटो शूट करण हा ट्रेंड सुध्दा सूरू आहे. तर लहान मुलांचे सुद्धा तुम्हाला इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कपडे ज्यामध्ये अगदी कुर्ता पायजमा पासून ते साउथ इंडियन लूक पर्यंत सगळं काही मिळेल. या दादरच्या साई गणेश कलेक्शन मध्ये तुम्हाला न्यू बॉर्न बेबी पासून ते 15 वर्षांच्या मुलींपर्यंत सगळ्यांचे कपडे मिळतील. यांची किंमत तर फक्त 350 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
तुम्हाला जर मकर संक्रांतीसाठी मॅचिंग करायचं असेल तर इथे मुलाचे आणि मुलीचे सुद्धा काळा रंगाचे सुंदर ड्रेसेस उपलब्ध आहेत. या सगळ्याचा कपडा कॉटनचा असल्यामुळे तुमच्या लहानग्यांना अजिबातच यात गरम होणार नाही आणि ते कम्फर्टेबल राहतील. सध्या लग्नाच्या सीझनमध्ये ट्रेडिंगवर असणारे खणाचे ड्रेसेस आणि त्यासोबतच चंद्राच्या साडीचे ड्रेसेस सुद्धा इथे मिळतील. यावर तुमचे चिमुकले अगदी सुंदर दिसतील.
advertisement
'आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आम्ही होलसेल हवा सुद्धा लहान मुलांचे कपडे विकतो. हे सगळे पॅटर्न आमचे स्वतः बनवलेले आहेत त्यामुळे दर पंधरा दिवसांनी आमच्याकडे वेगवेगळे लहान मुलांचे पॅटर्नचे कपडे येतात. आणि म्हणून त्यांचा दरही 350 पासून सुरू होतो' असे मंगेश गावकर यांनी सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2024 10:25 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नासाठी करा शॉपिंग, लहानग्यांचे सुंदर कपडे फक्त 350 रुपयांपासून, दादरमधील याठिकाणी करा खरेदी








