फक्त 450 रुपयांपासून खरेदी करा स्वेटर, 50 वर्षांपासून इथं हिवाळ्यात भरतोय बाजार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
थंडीचा कडाका वाढल्याने जालना शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन कपडे खरेदी करत आहेत.
जालनाः थंडीची चाहूल लागताच बाजारामध्ये गरम कपड्यांची दुकाने सजू लागली आहेत. जालना शहरांमध्ये मागील 50 वर्षांपासून नेपाळ येथून व्यापारी शुद्ध उलनचे कपडे घेऊन येतात. शहरातील पोलीस कॉम्प्लेक्स इथे जवळपास 50 दुकाने लागली असून या ठिकाणी उत्तम दर्जाची कपडे उपलब्ध झाली आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने जालना शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन कपडे खरेदी करत आहेत.
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जोरदार पाऊस झाला. उत्तरेकडून येत असलेल्या थंड हवेमुळे आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने थंडीमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमान 10 अंश सेल्शिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक गरम कपडे परिधान करण्यास प्राधान्य देत आहेत.
advertisement
यामुळेच या तिबेटियन मार्केटमध्ये सध्या जालना शहरातील नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील आणि बुलढाणा, परभणी सारख्या जिल्ह्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने स्वेटर, मफलर, टोपी, जॅकेट यांसारखे कपडे खरेदी करताना दिसत आहेत.
या बाजारामध्ये लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, ऑफिसला जाण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. साडेचारशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतचे स्वेटर आणि जॅकेट या मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मागील 50 वर्षांपासून आम्ही या ठिकाणी थंडीसाठी लागणारी कपडे घेऊन येतो. कपड्यांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे मागील 50 वर्षांचा विश्वास आमच्या सोबत आहे. यामुळेच नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत. यंदा थंडीचे प्रमाण देखील जास्त असल्याने ग्राहकांची गर्दी असल्याचे सोनम स्रिंग यांनी सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 14, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त 450 रुपयांपासून खरेदी करा स्वेटर, 50 वर्षांपासून इथं हिवाळ्यात भरतोय बाजार

