Winter Diet: हिवाळ्यात काय खावं अन् काय नको? उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

Last Updated:

Winter Diet: हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आहाराबाबत काळजी घेणं गरजेचं असतं. थंडीच्या काळात काय खावं? आणि काय नको? याबाबत जाणून घेऊ.

+
Winter

Winter Diet: हिवाळ्यात काय खावं अन् काय नको? निरोगी आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला

पुणे: हिवाळा सुरू झाला असून सर्वत्र गारठा वाढला आहे. वातावरणाच्या बदलामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. या काळात आपली शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास आपल्याला आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात देखील बदल करणं गरजेचं असतं. या काळात आपला आहार कसा असावा? याबाबत डॉ. शर्वरी इनामदार यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
डॉ. शर्वरी इनामदार यांनी सांगितलं की, हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी तीळ, बदाम, अक्रोड यांपासून बनवलेल्या लाडूंचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. तसेच, तूपही नियमितपणे खाल्ले पाहिजे, पण डायबिटीस, उच्च रक्तदाब, संधिवात किंवा थायरॉईड असलेल्या लोकांनी तूप पिष्टमय पदार्थांवर टाकून खाणे टाळावे. हिवाळ्यात प्रोटीनसाठी नॉनव्हेज, अंडी खाणे फायदेशीर ठरते. योग्य आहारासोबत नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. याशिवाय, हिवाळ्यात पुरेशी झोप घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
advertisement
हिवाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
हिवाळ्यात काही गोष्टी टाळणे देखील गरजेचे आहे. थंड पाणी आणि शीतपेये टाळा, कारण यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ कमी खाण्याचा सल्ला डॉ. इनामदार यांनी दिला आहे. याशिवाय, हिवाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे हात स्वच्छ ठेवणे आणि अन्न एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, खाण्याच्या वेळा नियमित ठेवणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Diet: हिवाळ्यात काय खावं अन् काय नको? उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement