Badlapur: 4 वर्षांची चिमुरडी शाळेतून घरी चालली होती, स्कुल व्हॅनमध्ये ड्रायव्हरने.., पोलीस स्टेशनमधून नवी अपडेट
- Published by:Sachin S
Last Updated:
बदलापूर शहरातील पश्चिम भागातील एका खासगी इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला आहे. इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा दुपारी सुटल्यानंतर पीडित मुलगी नेहमीसारखं घरी चालली होती.
बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली आहे. शाळेतून घरी जात असताना एका खासगी शाळेतील स्कुल व्हॅन ड्रायव्हरने ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची मन सुन्न करणारी आणि चिड आणणारी घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम ड्रायव्हरला अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बदलापूर हादरलं आहे. ज्या शाळेत ही घटना घडली, ती अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील पश्चिम भागातील एका खासगी इंग्रजी शाळेत हा प्रकार घडला आहे. इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा दुपारी सुटल्यानंतर पीडित मुलगी नेहमीसारखं घरी चालली होती. या शाळेत स्कुल बस अशी स्वंतत्र काही नव्हती. खासगी व्हॅन होत्या. याच व्हॅनमधून ही पीडित मुलगी घरी चालली होती. एकटी असल्याचं पाहून नराधम स्कुल व्हॅनचालकाने ४ वर्षांची चिमुरडीवर अत्याचार केले.
advertisement
पीडित चिमुरडी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिने सगळा प्रकार पालकांना सांगितलं. आपल्या ४ वर्षांच्या चिमुरडीसोबत घडलेल्या प्रकारामुळे पालकांना मोठा धक्का बसला. पीडित मुलीला घेऊन पालकांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
स्कुल व्हॅन फोडण्याचा केला प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले आणि पदाधिकारी संगीता चेंदवणकर आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. शाळेची स्कुल व्हॅन जेव्हा पोलीस स्टेशनला आण्यात आली तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्कुलवर व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली. पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, असं सांगितलं.
advertisement
आरोपीवर कडक कारवाई करा
"अत्यंत वाईट असा प्रसंग घडला आहे. एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आहे. शाळेच्या खासगी व्हॅन चालकाने हा प्रकार केला आहे. या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. आरोपी व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा करू नये, आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी केली आहे.
advertisement
"बदलापूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. ज्या शाळेत तुमच्या पाल्याला टाकताय, त्या शाळेची पूर्ण तपासणी करा. मागे घडलेल्या प्रकारानंतरही शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा निदर्शनास येत आहे. शाळेची नियमावली बदलापुरात लागू झाली नाही. शाळेची नियमावली आणखी कडक झाली पाहिजे, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शाळेत पीडित चिमुरडीवर अत्याचार झाले आहे, ती शाळा अनधिकृत होती, अशी माहिती राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांनी दिली.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 10:05 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Badlapur: 4 वर्षांची चिमुरडी शाळेतून घरी चालली होती, स्कुल व्हॅनमध्ये ड्रायव्हरने.., पोलीस स्टेशनमधून नवी अपडेट









