50 पेक्षा जास्त प्रकार, सुंदर इनडोअर प्लांट मिळण्याचं दादरमधील बेस्ट ठिकाण, VIDEO

Last Updated:

beautiful indoor plants in dadar - सध्या अनेक जण आपल्या घराची सुंदर पद्धतीने सजावट करण्यासाठी इनडोअर प्लांट हा ऑप्शन निवडतात. इनडोअर प्लांट्समध्ये, जर तुम्हाला सुंदर आणि युनिक पद्धतीच्या प्लांट, कुंड्या हव्या असतील तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

+
इनडोअर

इनडोअर प्लांट

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई - सध्या अनेक जण आपल्या घराची सुंदर पद्धतीने सजावट करण्यासाठी इनडोअर प्लांट हा ऑप्शन निवडतात. इनडोअर प्लांट्समध्ये, जर तुम्हाला सुंदर आणि युनिक पद्धतीच्या प्लांट, कुंड्या हव्या असतील तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
तुमच्यासाठी दादरमध्ये एक बेस्ट ऑप्शन आहेत. दादर स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अशोक नर्सरी येथे तुम्हाला सुंदर इनडोअर प्लांट्स उपलब्ध आहेत. यांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते आहे. दादरमधील अशोक नर्सरी येथे तुम्हाला इनडोअर प्लांट्समध्ये बोन्साय, कॉपल, स्पायडर प्लांट, अलोवेरा प्लांट अशा प्रकारची वनस्पती, झाडे उपलब्ध आहेत. या सगळया झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तरीही हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतात. यामुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी मदत होईल.
advertisement
इथे तुम्हाला इनडोअर प्लांट्स सोबतच सुंदर आऊटडोअर प्लांट्ससुद्धा मिळतील. यामध्ये सुद्धा तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या फुलांच्या कुंड्या तुम्ही विकत घेऊ शकता. सुंदर प्रकारचे मडकी आणि त्यासोबत कुंड्या येथे उपलब्ध आहेत. या कुंड्यांमध्ये सुद्धा कासवाच्या आकाराची कुंडी, गायीची कुंडी, वेगवेगळे डिझाईन असणाऱ्या कुंडी मिळतील. यांची किंमत फक्त 20 रुपयांपासून इथे सुरू होते.
advertisement
'आम्ही गेले अनेक वर्ष हा व्यवसाय करत आहोत. आमच्याकडे अगदी स्वस्तात इनडोअर प्लांट्स उपलब्ध आहेत. यांची किंमत सुद्धा कमी असल्यामुळे दादरकर आवर्जुन इथून झाडे खरेदी करतात,' असे दुकानदार रोहित कुमार यांनी सांगितले. तर मग तुम्हालाही तुमच्या घराचा आणि बाल्कनीचा लूक ट्रेडिंग आणि सुंदर करायचा असेल तर तुम्ही या इनडोअर प्लांट्सची खरेदी करू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
50 पेक्षा जास्त प्रकार, सुंदर इनडोअर प्लांट मिळण्याचं दादरमधील बेस्ट ठिकाण, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement