ठाणे जिंकण्यासाठी गणेश नाईक, बारामती जिंकण्यासाठी मुरलीधर मोहोळ, भाजपकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

Last Updated:

Local Body Election: कायम निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीर झाल्याच्या २४ तासाच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला असून कायम निवडणुकीसाठी तयार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने २४ तासाच्या आत विभागानुसार निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गणेश नाईक तर अजित पवार यांच्या बारामतीत मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी देऊन भाजपने आगामी काळातील इरादे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विरोधी पक्षासोबत जेवढा संघर्ष होईल तितकाच संघर्ष महायुतीतही होणार असल्याचे अटळ आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जबाबदार वाटप करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारीपदी गणेश नाईकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बारामतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणूक प्रभारीपदी आशिष शेलार यांच्याकडे सलग दुसऱ्यांदा जबाबदारी देण्यात आली आहे.
advertisement
क्र.संघटनात्मक जिल्हानिवडणूक प्रमुखनिवडणूक प्रभारी
1सिंधुदुर्गश्री. प्रमोद जठारश्री. नितेश राणे
2रत्नागिरी उत्तरश्री. विनय नातूश्री. निरंजन डावखरे
3रत्नागिरी दक्षिणश्री. अतुल काळसेकर
4रायगड उत्तरश्री. रामशेठ ठाकूरश्री. प्रशांत ठाकूर
5रायगड दक्षिणश्री. सतीश धारप
6ठाणे शहरश्री. संजय केळकर
7ठाणे ग्रामीणश्री. कपिल पाटील
8भिवंडीश्री. महेश चौघुले
9मीरा-भाईंदरश्री. नरेंद्र मेहताश्री. गणेश नाईक
10नवी मुंबईश्री. संजीव नाईक
11कल्याणश्री. नाना सूर्यवंशी
12उल्हासनगरश्री. प्रदीप रामचंदानी
13वसई-विरारश्री. राजन नाईकडॉ. हेमंत सावरा
14पालघरश्री. बाबाजी काटोळे
15मुरबाडश्री. विजय चौधरीश्रीमती रक्षा खडसे
16धुळे शहरश्री. अनूप अग्रवालश्री. जयकुमार रावल
17धुळे ग्रामीणश्री. कुणाल पाटील
18नाशिक शहरश्री. राहुल ढिकले
19नाशिक उत्तरडॉ. राहुल आहेरश्री. गिरीश महाजन
20नाशिक दक्षिणश्री. गिरीश पालवे
21मालेगावश्री. दादा जाधव
22जळगाव शहरश्री. राजूमामा भोळेश्री. संजय सावकारे
23जळगाव पूर्व (रावेर)श्री. नंदू महाजन
24जळगाव पश्चिमश्री. मंगेश चव्हाण
25अहिल्या नगर शहरश्री. विक्रम पाचपुते
26अहिल्या नगर उत्तरश्रीमती स्नेहलता कोल्हेश्री. राधाकृष्ण विखे पाटील
27अहिल्या नगर दक्षिणडॉ. सुजय विखे पाटील
28पुणे शहरश्री. गणेश बिडकर
29पुणे उत्तर (मावळ)श्री. महेश लांडगेश्री. मुरलीधर मोहोळ
30पुणे दक्षिण (बारामती)श्री. राहुल कुल
31पिंपरी चिंचवडश्री. शंकर जगताप
32सोलापूर शहरश्री. रघुनाथ कुलकर्णी
33सोलापूर पूर्वश्री. राम सातपुतेश्री. जयकुमार गोरे
34सोलापूर पश्चिम (माढा)श्री. सचिन कल्याणशेट्टी
35साताराश्री. धैर्यशील कदमश्री. शिवेंद्रराजे भोसले
advertisement
क्र.संघटनात्मक जिल्हानिवडणूक प्रमुखनिवडणूक प्रभारी
36कोल्हापूर शहरश्री.अमल महाडिकश्री.धनंजय महाडिक
37कोल्हापूर पू.(हातकलंगले)श्री.सुरेश हळवणकर
38कोल्हापूर प.(करवीर)श्री.महेश जाधव
39सांगली शहरश्री.शेखर इनामदारश्री.सुरेश खाडे
40सांगली ग्रामीणश्री.सत्यजीत देशमुख
41बुलढाणाश्रीमती श्वेता महालेश्री.आकाश फुंडकर
42खामगांवश्री.चैनसुख संचेती
43अकोला शहरश्री.विजय अग्रवालश्री.रणधीर सावरकर
44अकोला ग्रामीणश्री.अमित कावरे
45वाशिमश्री.राजू राजे पाटीलश्री.अनुप धोत्रे
46अमरावती शहरश्री.जयंत डेहनकरश्री.संजय कुटे
47अमरावती ग्रा. (मोर्शी)डॉ.अनिल बोंडे
48अमरावती ग्रा. (मेळघाट)डॉ.प्रविण पोटे पाटील
49यवतमाळश्री.नितीन भुतडाश्री.मदन येरावार
50पुसदश्री.निलय नाईक
51वर्धाश्री.रामदास तडसश्री.पंकज भोयर
52नागपूर शहरश्री.संजय मेंढेश्री.प्रविण दटके
53नागपूर ग्रा.(रामटेक)श्री.अरविंद गजभिये
54नागपूर ग्रा. (काटोल)डॉ.राजीव पोद्दार
55भंडाराश्री.प्रकाश बाळबुधेश्री.परिणय फुके
56गोंदियाश्री.संजय पुरमश्री.गिरीश व्यास
57गडचिरोलीश्री.प्रशांत वाघरेश्री.बंटी भांगडिया
58चंद्रपूर शहरश्री.किशोर जोरगेवारश्री.अशोक नेते
59चंद्रपूर ग्रामीणश्री.देवराव भोंगले
60नांदेड शहरडॉ.अजित गोपछडेश्री.अशोक चव्हाण
61नांदेड उत्तरॲड.श्रीजया चव्हाण
62नांदेड दक्षिणश्री.राजेश पवार
63परभणी शहरश्री.सुरेश वरपूडकरश्रीमती मेघना बोर्डीकर
64परभणी ग्रामीणश्री.रामप्रसाद बोर्डीकर
65हिंगोलीश्री.तानाजी मुटकुळेश्री.अशोक उईके
66जालना महानगरश्री.कैलास गोरंट्यालडॉ.भागवत कराड
67जालना ग्रामीणश्री.सुरेश बनकर
68छ.संभाजीनगर शहरश्री.समीर राजूरकरश्री.अतुल सावे
69छ.संभाजीनगर उत्तरश्रीमती अनुराधा चव्हाण
70छ.संभाजीनगर पश्चिमडॉ. प्रशांत बंबश्री.पंकज मुंडे
71बीडश्री.सुरेश सस
72लातूर शहरश्रीमती अर्चना पाटील चाकूरकरश्री.संभाजी पाटील निलंगेकर
73लातूर ग्रामीणश्री.अभिमन्यू पवार
74धाराशिवश्री.सुजितसिंह ठाकूरश्री.राणा जगजितसिंह पाटील
75मुंबईश्री.आशिष शेलार
advertisement
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.@RaviDadaChavan #BJP #Maharashtra pic.twitter.com/vpPv6F5izI
advertisement

निवडणूक कार्यक्रम जाहीर, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे. मात्र विरोधकांच्या आपेक्षानंतरही राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. २ डिसेंबरला मतदान होईल तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
ठाणे जिंकण्यासाठी गणेश नाईक, बारामती जिंकण्यासाठी मुरलीधर मोहोळ, भाजपकडून निवडणूक प्रभारींची घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement